IND vs NZ: दुसऱ्या वनडेपूर्वी भारताला मोठा धक्का, 'या' कारणामुळे ठोठावला दंड
Team India (Photo Credit - Twitter)

ICC ने टीम इंडियाला (Team India) दंड ठोठावल्यावर हैदराबादमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या (IND vs NZ) विजयाची मजा विरली. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium) खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमानांनी पाहुण्या संघावर 12 धावांनी विजय मिळवला. स्लो ओव्हर रेटमुळे (Slow over rate) भारतीय संघावर हा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताने संथ ओव्हर रेटने गोलंदाजी केली. याची दखल घेत सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी टीम इंडियाला मॅच फीच्या 60 टक्के दंड ठोठावला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 18 जानेवारी रोजी हैदराबाद येथे खेळला गेला.

या सामन्यात भारताने न्यूझीलंडच्या डावात संथ ओव्हर रेटने गोलंदाजी केली. एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांना टीम इंडियाला निर्धारित वेळेपेक्षा तीन षटके कमी टाकल्याबद्दल दोषी आढळले. त्यामुळे मॅच रेफरीने भारतीय संघाला मॅच फीच्या 60 टक्के दंड ठोठावला आहे. ICC आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, खेळाडूंनी निर्धारित वेळेत गोलंदाजी न केल्यास प्रत्येक षटकासाठी त्यांच्या सामना शुल्काच्या 20 टक्के दंड आकारला जातो. हेही वाचा IND vs NZ 2nd ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा मोडू शकतो 'या' पाकिस्तानी दिग्गजाचा विक्रम, पहा आकडेवारी

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने निर्धारित वेळेत तीन षटके कमी टाकली.  त्यामुळे टीम इंडियाला मॅच फीच्या 60 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने मैदानावरील पंच अनिल चौधरी आणि नितीन मेनन, तृतीय पंच केएन अनंतपद्मनाभन आणि चौथे पंच जयराम मदन गोपाल यांनी लावलेला आरोप स्वीकारला. त्यामुळे आता या प्रकरणावर कोणतीही औपचारिक सुनावणी होणार नाही. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल बोलायचे तर या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला.