इरफान खान (Photo Credits: Instagram)

मंगळवारी कोलन संसर्गामुळे बॉलीवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांची तब्येत बिघडल्याने सोमवारी त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आले होते. ज्यानंतर आज त्यांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. इरफान यांच्या मृत्यूच्या बातमीने क्रीडा क्षेत्रालाही धक्का बसला आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्व प्रसिद्ध खेळाडू इरफानच्या निधनाने सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. सायना नेहवाल (Saina Nehwal), सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मापासून, मोहम्मद कैफ, अमित मिश्रा (Amit Mishra) ते बॉक्सर विजेंदर सिंह (Vijender Singh) यांनी इरफानला श्रद्धांजली वाहिली. प्रकृती गंभीर असून त्याला ICU मध्ये ठेवण्यात आले होते. 2018 मध्ये इरफानला Neuroendocrine Tumour चे निदान झाले होते. परदेशात यावर त्यांनी उपचार घेतले आणि त्यानंतर ते भारतात परतले. यानंतर त्यांनी चित्रपटाचं शूटिंगही केलं. इरफान यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे 'अंग्रेजी मीडियम' या सिनेमाच्या प्रमोशनलाही त्याने हजेरी लावली नव्हती. (बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचे निधन; शूजीत सरकार याने ट्विट करत दिली माहिती)

शनिवारी त्यांची आई सईदा बेगम यांचा जयपूरमध्ये मृत्यू झाला. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन जारी करण्यात आला असल्याने इरफान आपल्या आईच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ शकले नाही. आणि आता इरफानही आयुष्याशी झुंज हरला. क्रीडा क्षेत्रातील खेळाडू आपले दुःख कसे व्यक्त करतात ते पहा.

विजेंदर सिंह

अमित मिश्रा

हर्षा भोगले

मोहम्मद कैफ

सायना नेहवाल

रोहित शर्मा

हरमनप्रीत कौर

विराट कोहली

सचिन तेंडुलकर

मोहम्मद शमी

इरफानच्या प्रवक्त्याने त्यांच्या प्रकृतीबद्दल काल एक निवेदन प्रसिद्ध केले होते. इरफानच्या टीमने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले होते की, “इरफान खान यांना कोलन संसर्गामुळे मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या धैर्याने आणि शौर्याने त्याला आतापर्यंत हे युद्ध लढण्याचे धैर्य दिले आहे आणि आम्ही खात्री बाळगतो की लवकरच त्याच्या दृष्टीने आणि प्रियजनांच्या आशीर्वादाने तो बरा होईल."