Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्सनंतर बर्मिंगहॅममध्ये 2 पाकिस्तानी बॉक्सर बेपत्ता; पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनची माहिती
Suleman Baloch and Nazeer Ullah Khan (PC - Twitter)

Commonwealth Games 2022: पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशन (Pakistan Boxing Federation) ने (पीबीएफ) बुधवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games) संपल्यानंतर काही दिवसांनी बर्मिंगहॅममध्ये (Birmingham) दोन राष्ट्रीय बॉक्सर (Boxers) गायब झाल्याची पुष्टी केली. पीबीएफचे सचिव नासिर तांग यांनी Dawn.com ला सांगितले की, सुलेमान बलोच (Suleman Baloch) आणि नझीरुल्लाह (Nazeerullah) हे दोन बॉक्सर इस्लामाबादला रवाना होण्याच्या काही तास आधी गायब झाले.

दोन्ही बॉक्सरची प्रवासी कागदपत्रे पीबीएफ अधिकाऱ्यांकडे आहेत, असेही त्यांनी सांगितले. बॉक्सर बेपत्ता झाल्याची माहिती ब्रिटीश सरकार आणि पोलिसांना देण्यात आल्याचे तांग यांनी सांगितले. (हेही वाचा - Mumbai Indians ने UAE, South Africa टी20 लीग मध्ये दोन नवीन फ्रेंचायझीच्या नावाची घोषणा केली)

सचिव नासिर तांग म्हणाले, “आम्ही प्रमाणित कार्यपद्धतीनुसार दोघांची कागदपत्रे जप्त केली आहेत. बॉक्सर्सचा लवकरच शोध घेतला जाईल.

दरम्यान, पाकिस्तान ऑलिम्पिक असोसिएशनने (पीओए) या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे.