इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) जेतेपद 5 वेळा जिंकणारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचायझी आता परदेशी लीगमध्येही धमाल करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की MI फ्रँचायझीचे मालक रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने UAE आणि दक्षिण आफ्रिकेच्या T20 लीगमध्ये दोन संघ विकत घेतले आहेत. MI ने फ्रँचायझीने या दोन संघांची नावे आणि लोगो जाहीर केले आहेत. यासोबतच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत नाव आणि लोगोही लॉन्च केला आहे. MI फ्रँचायझीने UAE च्या T20 लीगमध्ये त्यांच्या संघाला 'MI Emirates' असे नाव दिले आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या T20 लीगमध्ये त्याच्या संघाचे नाव 'MI केपटाऊन' आहे. हे दोन्ही संघ आणि आयपीएलचे मुंबई इंडियन्स हे सर्व एकाच MI कुटुंबाचे भाग आहेत.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)