Photo Credit- X

T20 World Cup 2024 SA vs AFG Semi Final 1: अफगाणिस्तानवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ अवघ्या 56 धावांत सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत अफगाणिस्तानच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिले नाही. यानंतर दक्षिण आफ्रिकेने लक्ष्याचा सहज पाठलाग केला. दक्षिण आफ्रिकेने या छोट्या लक्ष्याचा सहज पाठलाग करत अवघ्या 8.5 षटकांत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची या विजयात महत्त्वाची भूमिका आहे. अफगाणिस्तानने सर्वांनाच चकित करत सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने यंदा एकही सामना न गमावता सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता.20 संघांच्या या स्पर्धेत आतापर्यंत 16 संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले असून 4 संघ बाद फेरीत पोहोचले होते. त्यात आता अफगाणिस्तानने उपांत्य फोरीतील सामना गमावला आहे.

पोस्ट पहा-

अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात अफगाणिस्तानचे फलंदाज कमालीचे फ्लॉप ठरले आणि कोणत्याही खेळाडूला संघासाठी चांगली कामगिरी करता आली नाही. फक्त अजमतुल्ला उमरझाईला दुहेरी आकडा गाठता आला. या सामन्यात त्याने 10 धावा केल्या. रहमानउल्ला गुरबाज, नूर अहमद आणि मोहम्मद नबी यांना खातेही उघडता आले नाही.

तर, दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेकडून रीझा हेंड्रिक्सने 29 धावा केल्या. तर कर्णधार एडन मारक्रमने 23 धावा केल्या. हे दोन्ही खेळाडू शेवटपर्यंत नाबाद राहिले. संघाची सुरुवात तशी खराब झाली पण धावसंख्या कमी असल्याने दक्षिण आफ्रिकेचा निभाव लागला. क्विंटन डी कॉक अवघ्या 5 धावा करून क्लीन बोल्ड झाला. त्याला फजलहक फारुकीने बाद केले.