बकरी-ईदच्या अगोदर कुर्बानी फोटोज शेअर करत सरफराज अहमद याने ओढवला चाहत्यांचा रोष, Netizens ने PETA कडे केली कारवाईची मागणी
सरफराज अहमद (Photo by Nathan Stirk/Getty Images)

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद (Sarfraz Ahmed) याने स्वतःवर एक नवीन वाद ओढून घेतला आहे. बकर ईदच्या (Bakr Id) शुभ मुहूर्तापूर्वी सरफराजने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर कुरबानीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे. या दिवशी गुरे, बकऱ्या, मेंढ्या, उंट, म्हैस यांची बाली दिली जाते. सरफराजचे हे फोटोज आणि व्हिडिओ पाहून चाहते मात्र फार निराश जाहले दिसत आहे. त्यांच्या मते पाकिस्तानी कर्णधाराने सोशल मीडियावर जाऊन असे फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे चुकीचे आहे. काही चाहत्यांनी त्याच्या विवादास्पद कृत्यावर कडक टीका केली तर काहींना पेटाकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पेटा (PETA) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी प्राण्यांचे संरक्षण आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करते. (मोहम्मद आमिर मागोमाग, पाकिस्तानच्या वहाब रियाज याची देखील टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती)

कुर्बानीचे फोटोज शेअर करताना सरफराजने ट्विटरवर कॅप्टिव देत लिहिले की,'तयारी पूर्ण आहे…स्टेज सेट आहे…ईद_इ_कुर्बानी ची वाट बघत आहे. कुर्बान होण्यासाठी आमचे बछडे पण तयार आणि बेताब आहे. अल्लाह सगळ्यांची तयारी आणि बाली कबूल करो… यावर नेटिझन्सने आपली कशी प्रतिक्रिया दिली ते पहा:

@पेटा मेजवानीची वाट पहात आहे …

भावा, आपल्या नातेवाईकाचा बळी देण्याची प्रथा आहे…यापेक्षा काय चांगले होईल

प्रसिद्धी स्टंट…

आयसीसी क्रिकेट विश्वचषकमधील पाकिस्तानच्या साखळी सामन्यातील पराभवामुळे संपूर्ण संघाने चाहत्यांचा रोष ओढवून घेतला आहे. सरफराजचे कर्णधार पद देखील धोख्यात आले. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डच्या पुढील बैठकीत नवीन कर्णधाराबद्दल चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.