खेळ जगतातील सर्वात महागडा करार; या 27 वर्षीय खेळाडूला आठवड्याला मिळणार 4.7 कोटी रुपये
माईक ट्राउट (Photo Credit : YouTube)

अमेरिकेचा बेसबॉल खेळाडू माईक ट्राउट (Mike Trout) ने खेळ जगतातील सर्वात महागडा करार केला आहे. अवघ्या 27 वर्षीय माईकने अमेरिकेचा बेसबॉल संघ एलए एंजल्स (Los Angeles Angels) सोबत, 12 वर्षांसाठी तब्बल 2960 कोटींचा करार केला आहे. या करारानुसार माईकला दरवर्षी 247 कोटी रुपये, तर दर आठवड्याला सरासरी 4.7 कोटी रुपये मिळणार आहेत. याआधी मेक्सिकोचा बॉक्सर केनेल्लो अल्व्हरेझचा करार सर्वात महागडा करार म्हणून ओळखला गेला होता, मात्र आता माईकने केनेल्लोलाही मागे टाकले आहे. केनेल्लोचा हा करार 2680 करोड रुपयांचा होता.

अमेरिकेच्या मेजर लीग बेसबॉल (एमएलबी) मध्ये माईक दोन वेळा सर्वात महागडा खेळाडू म्हणून निवडला गेला होता. त्याने आतापर्यंत 1065 सामन्यांत 1187 हिट मारले आहेत. त्याला ‘रुकी ऑफ द ईयर’ या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. तसेच तो सहा वेळा सिल्व्हर स्लगर पुरस्काराचाही विजेता ठरला आहे. (हेही वाचा: आता IPL मध्ये 1 लाख रुपये आणि SUV Harrier जिंकण्याची संधी; करावे लागेल फक्त 'हे' काम

खेळाडूंच्या दरवर्षीच्या सरासरी कमाईविषयो बोलायचे झाले तर, अमेरिकेचा बॉक्सर फ्लॉइड मेवेदर अव्वल स्थानी आहे. 2018 च्या फोर्ब्सच्या यादीनुसार, त्यांचे सरासरी उत्पन्न 1962 कोटी आहे. त्यानंतर अर्जेंटाइन फुटबॉलपटू लियोनेल मेसी (765 कोटी) आणि पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो (743 कोटी रुपये) तिसऱ्या स्थानावर आहे.