इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पी.व्ही.सिंधू हिला रौप्य पदक, जपानच्या अकाने यामागुची हिने पटकावले विजेतेपद
P. V Sindhu (Photo Credits: Hotstar)

भारताची फुलराणी पी व्ही सिंधू (P. V.  Sindhu)  हिचे इंडोनेशिया ओपन स्पर्धेत  (Indonesia Open Final) विजयाचे ध्येय एन अंतिम फेरीत येऊन संपुष्टात आले आहे. जपानच्या अकाने यामागुची (Akane Yamaguchi) हिने 15-21, 16-21 असा एकतर्फी खेळ करत सिंधूचा पराभव केला ज्यामुळे या स्पर्धेत सिंधूला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले आहे . सामन्याच्या दरम्यान सुरवातीपासूनच आक्रमक खेळी खेळत असलेल्या यामागुची हिने सिंधूवर मानसिक दबाव कायम ठेवला होता. पहिल्या फेरीत 21-15 अशी बाजी मारून यामागुचीने हा दबाव आणखीनच वाढावला अखेरीस दुसऱ्या गेममध्येही 21-16 असा विजय मिळवत तिने सामना जिंकला आणि परिणामी इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद देखील पटकावले.

यापूर्वी ऑलिम्पिक मध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या स्टार पी. व्ही. सिंधू हिने शनिवारी ऑल इंग्लंड चॅम्पियन चेन युफेई हिच्यावर मात करत इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या चेनवर सिंंधूने 21-19, 21-10 अशा फरकाने विजय नोंदविला. चेन हिने यापूर्वी ऑस्ट्रेलियन, स्विस आणि ऑल इंग्लंड ओपन मध्ये सुद्धा विजय मिळवला आहे,तसेच यंदाही  चेन दमदार खेळ करीत होती. सिंधूने मात्र तिला संधीच दिली नव्हती. त्यामुळे अंतिम फेरीत सिंधूकडून भारतीय तसेच क्रीडारसिकांना दमदार खेळीची अपक्षा होती. मात्र यामागूची हिच्यासमोर सिंधूचा निभाव लागू शकला नाही.