Pro Kabaddi 2019: अंतिम मिनिटात बेंगलुरू बुल्सचा बंगाल वॉरियर्स संघावर 43-42 ने विजय
(Photo Credit: @ProKabaddi/Twitter)

प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) मधील आजच्या सामन्यात बेंगळुरू बुल्सने (Bengaluru Bulls) शेवटच्या क्षणी प्रभावी खेळ दाखवत बंगाल वॉरियर्सचा (Bengal Warriors) 43-4२ ने पराभव केला. गतजेता बेंगळुरूच्या संघाने शेवटच्या 4 मिनिटांत धमाकेदार खेळीने बंगालकडून विजय खेचून घेतला. विजयाचा नायक असलेल्या पवन सहरावतने 29 गुण मिळवले. पटना लेगच्या दुसर्‍या सामन्यात बंगालचा संघ शनिवारी पहिल्या अर्ध्याअखेर 21-18 ने पुढे होता. दुसऱ्या हाल्फच्या 10 व्या मिनिटाला बंगालचा संघ 10 गुणांसह आघाडीसह 35-25 पुढे होता. पण दुसर्‍या हाफच्या शेवटच्या मिनिटाला बंगळुरू जोरदार पुनरागमन केले. सामन्याच्या 36 व्या मिनिटाला बेंगळुरूने 40-40 ची बरोबरी साधली आणि त्यानंतर सलग तीन गुण घेत बंगालच्या तोंडातून विजय मिळविला. (Pro Kabaddi 2019: जयपुर पिंक पैंथर्स कडून पटणा पायरट्स यांचा 34-21 ने पराभव)

बंगालने पहिल्या हाल्फमध्ये वर्चस्व गाजवले आणि एका टप्प्यावर 14-4 अशी आघाडी देखील मिळवली होती. पण मनिंदर शांत आणि एकत्रित कामगिरी करत राहिला. आणि नंतर त्याला साथ मिळाली ती मोहम्मद नबिबख्श याची. दोंघांनी मिळून संघासाठी वीजयाची खात्री करुन घेतली. बेंगळुरूसाठी सौरभ नांदल याने सहा अंकांची कमाई केली. बेंगळुरूच्या मागील चार सामन्यातील हा दुसरा विजय होता. बंगळुरूला रेड मधून 31, टॅकलमधून आठ आणि ऑल आउटमधून चार गुण मिळाले. बंगालकडून प्रपंजन यांनी 12 आणि मनिंदरने 11 गुण मिळवले. पवन सेहरावत आता या हंगामातील एकूण 57 रेड पॉइंट्ससह अग्रगण्य खेळाडू आहे. पण बेंगळुरू संघाला जर त्यांचे जेतेपद टिकवून ठेवायचे असल्यास त्यांच्या अन्य खेळाडूंचा सहभाग देखील महत्वाचा आहे.

बेंगळुरूचा संघ गुणतालिकेत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांनीं 4 पैकी 3 सामने जिंकत 15 गुणांची कमाई केली आहे. दुसरीकडे, बंगालचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे. त्यांनी 4 सामन्यांपैकी 2 जिंकले तर 2 मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.