Tokyo Olympics 2020: पुरुष हॉकी संघ, ताजिंदरपाल सिंग तूर यांच्यासह भारतीय खेळाडू उद्या उतरणार मैदानात, येथे पाहा 3 ऑगस्ट रोजीचे संपूर्ण शेड्युल
भारत पुरुष हॉकी (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020 India Schedule: जपानची (Japan) राजधानी असलेल्या टोकियोमध्ये ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) महाकुंभाचे रणशिंग फुंकलं गेलं आहे. ऑलिम्पिक खेळाचे 10 दिवस पूर्ण झाले असून दहाव्या दिवशी भारतीय हॉकी संघाने इतिहास रचला आणि पहिल्यांदा ऑलिम्पिक खेळाच्या सेमीफायनल फेरीत प्रवेश केला. त्यामुळे आता भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या असून आता संघ सुवर्ण पदकापासून फक्त दोन पाऊल दूर आहे. अशा स्थितीत आता अकराव्या दिवशी देखील भारतीय खेळाडू पदक निश्चित करण्यासाठी मैदानात उतरतील. खेळाच्या अकराव्या दिवशी पुरुष हॉकी संघासह (India Men's Hockey Team) ताजिंदरपाल सिंह तूर, भाला फेक प्रकारात अन्नू राणी (Annu Rani) आणि कुश्तीपटू सोनम मलिक  (Sonam Malik) देशासाठी पदक मिळवण्यासाठी आपली मोहीम सुरु करतील. टोकियो ऑलिम्पिकच्या 11व्या दिवशी म्हणजेच मंगळवाडी भारतीय खेळाडूंच्या शेड्युलविषयी माहिती जाणून घेऊया. (Tokyo Olympics 2020: भारतीय Equestrian फवाद मिर्झाने मिळवले फायनलचे तिकीट, आता पदकासाठी होणार मुकाबला)

ऑलिम्पिक खेळांच्या अकराव्या दिवशी उद्या भारतीय खेळाडूंचे प्रमुख सामने होणार आहे. 3 ऑगस्ट रोजी पुरुष हॉकी संघावर सर्वांची नजर असेल जे ऑलिम्पिक फायनलच्या दिशेने विजयी मालिका सुरु ठेवण्याच्या निर्धाराने बेल्जियम संघाचा सामना करेल. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वातील संघाने ग्रेट ब्रिटनविरुद्ध 3-1 ने उपांत्यपूर्व फेरी जिंकून 49 वर्षांच्या दीर्घ अंतरानंतर स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. शिवाय, भारताची अॅथलेटिक्स टीम मंगळवारी मैदानात उतरेल. यामध्ये भालाफेकमध्ये अन्नू राणी खेळताना दिसेल तर पुरुषांच्या शॉट पुट पात्रता फेरीत ताजिंदर सिंह तूर भाग घेईल. कुस्ती स्पर्धेत मंगळवारपासून भारताचे आव्हान सुरू होईल. सोनम मलिक महिलांच्या 62 किलो फ्रीस्टाइल प्रकारात आव्हान देईल.

ट्वीट- 

यंदा भारताकडून 127 खेळाडू पदक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये 117 खेळाडूंनी पात्रता मिळवली होती.तसेच यंदा भारत ऑलिम्पिक सहभागाचे 100वे वर्ष असून यंदा देशाला प्रभावी कामगिरीसह पदकांची अपेक्षा देखील असणार आहे. 18 क्रीडा प्रकारांत भारत सहभाग नोंदवला आहे.