सौरभ वर्मा (Photo Credit: IANS)

व्हिएतनाम ओपन स्पर्धेत भारताचा स्टार बॅडमिंटनपटू सौरभ वर्मा याने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत चिनी खेळाडू सन फि जिआंगचा 21-12, 17-21 आणि 21-14असा पराभव केला. चिनी खेळाडूचा पराभव करत सौरभने व्हिएतनाम ओपनचे जेतेपद जिंकले. या दोघांमधील ही दुसरी लढाई होती आणि दोन्ही वेळा सौरभ विजयी ठरला. यापूर्वी स्लोव्हेनिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सौरभने यापूर्वी कोगाचा पराभव केला होता. शनिवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या सौरभने जपानच्या मिनोरू कोगाचा 22-20, 21-15 असा पराभव करून अंतिम फेरीपर्यंत प्रवेश केला. जिआंगविरुद्ध विजय मिळवण्यासाठी सौरवला फारशी अडचण आली नाही कारण जिआंग जगातील 68 व्या तर सौरभ 38 व्या क्रमांकावर आहेत. तरीही या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलीच झुंज पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंमधील सामना एकूण एक तास 12 मिनिटे चालला.

सौरभसाठी मॅचची चांगली सुरुवात झाली आणि पहिल्या सामन्यात तो प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खूपच आरामदायक दिसत होता. त्याने सहजतेने पहिला गेम जिंकत सामन्यात आघाडी मिळवली. पण, दुसर्‍या गेममध्ये जिआंगने जोरदार सुरुवात केली आणि एका वेळी 8-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर, सौरभने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार झुंज पाहायला मिळाली. अखेरीस चिनी खेळाडूने गेम जिंकला आणि सामना बरोबरीत आणला. तिसर्‍या आणि निर्णायक गेममध्ये सौरभने जुन्या चुका पुन्हा केल्या नाहीत. ही स्पर्धा खडतर होती, परंतु नियंत्रण न गमावता सौरभने विजेतेपद जिंकले. सौरभचे हे चौथे बीडब्ल्यूएफ सुपर 100 चे विजेतेपद आहे. यापूर्वी राष्ट्रीय चॅम्पियन सौरभने मागील वर्षी डच ओपन आणि कोरिया ओपनचे जेतेपद मिळवले होते.

या दोघांमधील हा तिसरा सामना होता. यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये सौरभने विजय मिळविला आहे. यावर्षी हैदराबाद ओपन आणि कोरिया ओपनमध्ये सौरभने जिआंगचा पराभव केला.