टेनिस सुपरस्टार सेरेना विलियम्सचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेमध्ये आहे. ऐरवी टेनिसचं मैदान गाजवणारी सेरेना विल्यम्स टॉपलेस होऊन एक खास गाणं म्हणताना दिसत आहे. वर पाहता हा प्रकार तुम्हांला विचित्र वाटला असला तरीही यामागील मूळ हेतू मात्र अत्यंत महत्त्वाचा आहे.
सेरेना विल्यम्स जागतिक स्तरावर ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी खास पुढे आली आहे. ऑक्टोबर महिना हा जागतिक ब्रेस्ट कॅन्सर अव्हेरनेस मंथ म्हणून ओळखला जातो. ब्रेस्ट कॅन्सरला वेळीच ओळखण्याचा एक मार्ग म्हणजे सेल्फ ब्रेस्ट एक्झाम. मात्र स्त्रियांमध्ये स्वतःच्या आरोग्याबाबत असलेली अनास्था त्यांना भविष्यात महाग पडते. म्हणूनच सेरेना विल्यम्सने हा घाट घातला आहे.
ब्रेस्ट कॅन्सर नेटवर्क ऑस्ट्रेलियासोबत पुढे आली आहे. या संस्थेसोबत सेरेना ब्रेस्ट कॅन्सरबाबत समाजात जागृती निर्माण करत आहे. याकार्यक्रमाचा एक भाग म्हणून सेरेनाने 'आय टच मायसेल्फ' हे गाणं गायलं आहे. इंस्टाग्रामवर या कार्यक्रमाबाबत भावना व्यक्त करताना प्रत्येक महिलेसाठी सेल्फ ब्रेस्ट एक्झाम करणं आवश्यक असल्याचं तिने म्हटलं आहे.