Sania Mirza (Photo Credits: Instagram)

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक सोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान भारताची टेनिस स्टार सानिया मिर्जा (Sania Mirza) कडून निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. सानियाने निवृत्तीची घोषणा ही तिच्या दुखापतींच्या कारणांवरून केली आहे. दरम्यान सानिया पुढील महिन्यात प्रोफेशनल टेनिस करियर मधून निवृत्त होणार आहे. दुबई मधील टेनिस चॅम्पियनशीप (Dubai Duty Free Tennis Championships 2023) ही तिची शेवटची मॅच असणार आहे. दुबई टेनिस चॅम्पियनशीपची सुरूवात 19 फेब्रुवारी दिवशी होणार आहे. यामधील सामना सानियाच्या करियर मधील शेवटचा सामना असणार आहे.

36 वर्षीय सानिया मिर्जा डबल्स मध्ये वर्ल्ड नंबर 1 आहे. सानिया कडून मागील वर्षीच 2022 च्या अखेरीस ती टेनिस मधील आपल्या करियरला अलविदा म्हणेल असं सांगण्यात आलं होतं. पण दुखापतींमुळे ती युएसए ओपन खेळू शकली नव्हती. पण यंदा ती पहिला ग्रॅंड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार आहे. त्यानंतर दुबईमध्ये चॅम्पियनशीप खेळणार आहे. नक्की वाचा: Sania Mirza Retirement: निवृत्तीची घोषणा केल्याचा सानिया मिर्झाला पश्चाताप, म्हणाली – ‘लवकरच केली’; घेणार का यू-टर्न? 

The Dubai Duty Free Tennis Championships, हा   WTA 1000 event आहे त्याची सुरूवात 19 फेब्रुवारी दिवशी होणार आहे. मागील काही दशकांपासून सानिया दुबई मध्ये वास्तव्यास आहे. त्यामुळे आपल्या लोकांच्या सानिध्यामध्येच ती Emirates Stadium मध्ये टेनिस कारकीर्दीला अलविदा म्हणणार आहे. 36 वर्षीय सानिया दुखापतींनी ग्रस्त असल्याने तिला लवकर आपली कारकीर्द संपवावी लागत आहे. सानियाला 4 वर्षीय मुलगा आहे.

भारताचं प्रतिनिधित्व करणार्‍या सानिया मिर्झाला, अर्जुन पुरस्कार (2004), पद्मश्री पुरस्कार (2006), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (2015) आणि पद्मभूषण पुरस्कार (2016) ने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सानियाने आतापर्यंत 6 मोठ्या चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद मिळवलं आहे.