![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/11/ronaldo-1-380x214.jpg)
प्रत्येकजण आपला वाढदिवस आनंदात साजरा करण्याच्या नादात खूप खूश असतो. तसेच दिवसभर पार्टी नाचगाणे यांचा घरच्या घरी किंवा बाहेर वाढदिवस साजरा करण्याचा बेत केला जातो. त्यामुळेच पोर्तुगाल संघाचा फुटबॉलपटू रोनाल्डो (Ronaldo) याने मुलीच्या पहिल्या वाढदिवासानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते. परंतु मोजक्याच लोकांसोबत तो मुलीचा वाढदिवस साजरा करताना दिसून आला.
रोनाल्डोची लहान मुलगी एलेना मार्टिना हिचा पहिला वाढदिवस होता. त्यावेळी रोनाल्डोने पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी रोनाल्डोचे दोन खास मित्र आणि परिवारासोबत हा वाढदिवस साजरा केला गेला. मात्र वाढदिवासाच्या पार्टीसाठी गेलेल्या रेस्टॉरंटमध्ये त्याने आपल्या दोन मित्रांसोबत रिचिबर्ग ग्रँड क्रू आणि पोमेरोल पॅट्रस या प्रसिद्ध कंपनीची दारु ऑर्डर केली होती. तर या कंपनीच्या एका बॉटलची किंमत 9-18 पाऊंड एवढी होती. मात्र दारुचा आनंद घेत मुलीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याने 27 हजार पाऊंड म्हणजेच 25 लाख रुपयांचे बिल भरले आहे.
मात्र मुलीच्या वाढदिवसाच्या आनंदात रोनाल्डोने फक्त 15 मिनिटे या रेस्टॉरंटमध्ये वेळ घालवून 25 लाख रुपयांच्या दारुचा आनंद घेतला आहे.