Pro Kabaddi League 2019: Patna Pirates संघाचा पहिला विजय; Telugu Titans संघावर 34-22 ने मात
Telugu Titans vs Patna Pirates (Photo Credits: Twitter)

प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सीजनमधील 11 वा सामना पटना पाइरेट्स (Patna Pirates) आणि तेलुगू टाइटंस (Telugu Titans) यांच्यात हेद्राबादमधील गाचीबावली इंडोर स्टेडिअमवर रंगला. या सामन्यात पटना पायरेट्सने तेलुगू टायटंस संघाला 34-22 अशी मात देत विजय मिळवला.

तेलुगू टाइटंसच्या होम ग्राऊंटवरील हा शेवटचा सामना होता. तेलुगू टाइटंसला आपल्या होम ग्राऊंडवर एकही सामना जिंकण्यास यश आले नाही. पहिल्या सामन्यात त्यांना यू मुम्बाने 31-25 ने हरवले होते. तर दुसऱ्या सामन्यात तामिळ थलायवाजने 39-26 आणि तिसऱ्या सामन्यात दबंग दिल्ली संघाने 34-33 असे पराभूत केले होते. (Pro Kabaddi League 2019: गुजरात फॉर्च्यून जायंट्स संघाचा यूपी योद्धा संघावर 44-19 ने एकतर्फी विजय)

प्रो कबड्डी ट्विट:

पटना पायरेट्स संघाचा हा पहिला विजय ठरला आहे. या आधीच्या सामन्यात त्यांना गतविजेत्या बंगलोर बुल्स संघाकडून 34-32 असा पराभव स्विकारावा लागला होता. पटनाच्या टीमने या सामन्यात सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. त्यांनी तेलुगू टीमला दोन वेळा ऑलआऊट केले. पहिल्या सत्राच्या अखेरीस पटनाच्या टीमने 23-9 अशी भक्कम आघाडी घेत आपला विजय निश्चित केला होता. दुसऱ्या सत्रात तेलुगू संघाने चांगली खेळी केली. मात्र ते विजयापासून दूरच राहीले.

पटना पायरेट्सच्या प्रदीप नरवाल याने जबरदस्त कामगिरी करत संघासाठी 7 गुण मिळवले. तर जयदीपने 6 गुण, जॅग कुन ली ने 4 गुणांचे योगदान दिले.

तेलुगू टायटन्स संघाकडून सिद्धार्थ देसाई सर्वाधिक गुण 6 गुण मिळवले. परंतु, संघातील इतर खेळाडूंची साथ न लाभल्याने हा संघ विजयापासून वंचित राहिला.