Pro Kabaddi League 2019: Jaipur Pink Panthers ची विजयी सुरुवात; U Mumba संघावर  मात
Pro Kabaddi League 2019 | U Mumba vs Pink Panthers | (Photo Credits: Twitter)

आज (22 जुलै) रंगलेल्या प्रो कबड्डी लीग 2019 (Pro Kabaddi League) मधील U Mumba vs Pink Panthers सामन्यात यू मुंबा वर पिंक पॅन्थर संघाने 42-23 च्या फरकाने मात केली. खेळाडूंमधील समन्वयाचा अभाव आणि अनुभवी चढाईपटूंची कमतरता यामुळे यू मुंबा संघाला पराभवाचा सामना करावा लागला. (आज होणार U Mumba vs Pink Panthers आणि Puneri Paltan vs Haryana Steelers मध्ये चुरशीची लढत)

जयपूर पिंक पँथर्सने पहिल्या सत्राची चांगली सुरुवात केली. कर्णधार दिपक हुडासह दिपक नरवाल, नितीन रावल यांनी आक्रमक चढाया करत पहिल्या सत्रात यू मुम्बाला ऑलआऊट केलं आणि 10-2 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात यू  मुंबाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. अभिषेक सिंह आणि डाँग जिऑन ली यांनी चांगल्या गुणांची कमाई केली. मात्र बचावफळीत कर्णधार फजलच्या उतावळेपणामुळे जयपूरला पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी मिळाली आणि 42-23 च्या फरकाने जयपूरने यू मुंबावर मात करत स्पर्धेची यशस्वी सुरुवात केली.

प्रो कबड्डी ट्विट:

मुंबई संघाचा हा दुसरा सामना असून पहिल्या सामन्यात तेलगू टायटन्स (Telugu Titans) संघावर 31-25 ने मात करत यु मुम्बा संघाने विजय प्राप्त केला होता. तर जयपूर पिंक पॅंथर (Jaipur Pink Panther) चा हा पहिलाच सामना असून त्यांनी स्पर्धेची विजयी सुरुवात केली.