Pro Kabaddi League 2019: आज होणार U Mumba vs Pink Panthers आणि Puneri Paltan vs Haryana Steelers मध्ये चुरशीची लढत
यू-मुंबा (Photo Credits: prokabaddi.com

प्रो कबड्डी लीग 2019 (Pro Kabaddi League) चा हा तिसरा दिवस आहे आणि सामने आतापासूनच रंगतदार होत आहे. 12 संघांपैकी सहा संघ आतापर्यंत खेळले आहे. आज 22 जुलैला अजून तीन संघ-जयपूर पिंक पॅंथर (Jaipur Pink Panther), पुनेरी पल्टन (Puneri Paltan) आणि हरियाणा स्टीलर्स (Haryana Steelers), हे तीन संघ या हंगामातील आपले पहिले सामने खेळतील. तर यू-मुंबा (U-Mumba) आज आपला दुसरा सामना खेळणार आहे. आपल्या पहिल्या सामन्यात तेलगू टायटन्स (Telugu Titans) संघाला 31-25 असे पराभूत करत मुंबई संघाने पीकेएलची विजयी सुरुवात केली आहे. यू-मुंबाचा दुसरा सामना पँथरशी होणार आहे. जयपूर संघ पहिल्या पीकेएल चा विजेता राहिला आहे. जयपूर हा प्रतिभावान तरुण आणि अनुभवी कबड्डीपटुंचा उत्कृष्ट असलेला संघ आहे. त्याचबरोबर तो मोसमातील कोणत्याही संघाला कठोर आव्हान देऊ शकते. पँथर्स आपल्या पीकेएल 2019 ची विजयी सुरुवात करत आहे. यू-मुंबा सारख्या मोठ्या संघाविरुद्ध विजयाने त्यांचा मनोबळ उंचावेल.

दुसरीकडे, डिफेंडर 'सुल्तान' फजेल अत्र्राची (Fazel Atrachali) याच्या नेतृत्वाखाली यू-मुंबाने घरेलू संघ तेलुगू टायटन्सविरुद्ध पहिल्या सामन्यात विजय मिळविला. 2015 मध्ये यू-मुंबा पहिल्यांदा प्रो कबड्डी लीगचा विजेता बनला होता.

पीकेएलमध्ये आज दुसरा सामना पुणेरी पल्टन आणि हरियाणा स्टीलर्स या दोन संघात होईल. दोन्ही संघाचा हा पहिला सामना असणार आहे. आणि दोन्ही संघ यंदाच्या हंगामाची सुरुवात विजयाने करू पाहतील. पण या सामन्यात मुख्य आकर्षण असतील ते अनूप कुमार (Anup Kumar) आणि राकेश कुमार (Rakesh Kumar). दोन्ही माजी कबड्डीपटू प्रो कबड्डीचे कोच म्हणून पदार्पण करणार आहे. अनुप हे पुणेरी पल्टनचे प्रशिक्षक आहे तर त्यांचे मित्र राकेश हरियाणा संघाला प्रशिक्षण देत आहे. दोन्ही आंतरराष्ट्रीय आणि पीकेएलच्या मैदानावर एकत्र खेळले आहे. आणि या दोन्ही प्रशिक्षकांच्या संघातील आमना-सामना नक्कीच रंगतदार असणार आहे. पल्टनने यंदाच्या पर्वासाठी कर्णधार पदाची जबाबदारी सुरजीत सिंह याच्यावर सोपवली आहे. सुरजीतचा अनुभव पल्टनसाठी फायदेशीर असेल आणि ते देखील पुढाकार घेत संघाचे नेतृत्व करेल.

दरम्यान, सदाहरित धर्मराज चेरालथन (Dharmaraj Cheralathan) हरियाणा स्टीलर्सचे नेतृत्व करतील. यंदा धर्मराज संघात विजयी मानसिकता बळकट करण्याचा प्रयत्न करतील. धर्मराज यांनी याआधी 2017 मध्ये पटना पायरेट्स चे नेतृत्व केले होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली संघाने पहिल्यांदा प्रो कबड्डीचे जेतेपद मिळवले होते.