प्रो कबड्डी (Pro Kabaddi) लीगच्या सातव्या सत्रात, शुक्रवारी यू मुंबा (U Mumba) आणि तमिळ थलायवाज (Tamil Thalaivas) या संघांमध्ये थरारक सामना रंगला. या रोमांचक सामन्यात यू मुंबाने तमिळ थलायवाज यांना त्यांच्याच मातीत धूळ चारली आहे. हा सामना चेन्नई मधील जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियम या ठिकाणी खेळला गेला. या सामन्यात यू मुंबाने तमिळ थलायवाजचा 29-24 असा पराभव केला. अशाप्रकारे तामिळ संघ त्यांच्याच मातीत एकही सामना जिंकण्यात यशस्वी ठरला नाही.
फर्स्ट हाफमध्ये तामिळ थलायवाज, यू मुंबाच्या तुलनेत 2 गुणांनी आघाडी मिळविण्यात यशस्वी झाला. पहिल्या हाफच्या अगदी सुरुवातीला मोहित छील्लर बाहेर गेल्यानंतर यू मुंबाने आघाडी घेण्याचे संकेत दिले.
दुसर्या हाफमध्ये संदीप नरवाल आणि अथुल एमएस यांनी यू मुंबाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यास सुरुवात केली. यू मुंबाने तमिळ संघाला ऑल आउट करत 5 गुणांनी आघाडी घेतली. शेवटच्या मिनिटाला मुंबई संघाने राहुल चौधरी आणि अजय ठाकूर यांना बाद करून तमिळ संघाच्या अडचणी अजून वाढवल्या. शेवटी 29-24 अशा गुण संख्येनी यू मुंबाने तमिळ थलायवाजवर आघाडी मिळवली. (हेही वाचा: यू मुंबा संघाला धूळ चारत हरियाणा स्टीलर्स ठरला दमदार विजेता, प्रो कबड्डी 2019 पर्वात मिळवला पाचवा विजय)
यू मुंबा संघ -
रेडर: अभिषेक सिंह, अरुण डेसवाल, अथुल एमएस, डोंग जेंग ली, गौरव कुमार, नवनीत, रोहित बालियान, विनोद कुमार
डिफेंडर: राजागुरु सुब्रमण्यम, हर्ष वर्धन, अनिल, हरिंद्र सिंह, योंग चेंग कू, फजल अत्राचली, सुरेंद्र सिंह
ऑलराउंडर: अजिंक्य रोहिदास कापरे, मोहित बालियान, संदीप नरवाल.
तमिळ थलायवाज संघ -
रेडर: अजय ठाकूर, आनंद, राहुल चौधरी, शब्बीर बापू, व्ही अजित कुमार, विनीत शर्मा, यशवंत बिश्नोई
डिफेंडर: अजित, एम अभिषेक, पोनप्रतीभान, हिमांशु, मोहित छील्लर, सागर, मिलाद शायबेक
ऑलराउंडर: हेमंत चौहान, मनजीत छिल्लर, रण सिंग, व्हिक्टर ओबेरॉय.