Pro Kabaddi 2019: यू मुंबा संघाला धूळ चारत हरियाणा स्टीलर्स ठरला दमदार विजेता, प्रो कबड्डी 2019 पर्वात मिळवला पाचवा विजय
U Mumba Vs Haryana Steelers | Realme 5 Pro | (Photo Credits: prokabaddi )

Pro Kabaddi, U Mumba Vs Haryana Steelers 2019: प्रो कबड्डी लीग (PKL) 2019 च्या सातव्या पर्वातील एकोणपन्नासवा सामना आज ( सोमवार, 20 ऑगस्ट 2019) यू मुंबा (U Mumba) आणि हरियाणा स्टीलर्स ( Haryana Steelers) यांच्यात खेळला गेला. चेन्नयी येथील चेन्नई येथील जवाहरलाल नेहरु इंडोर स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या अत्यंत रोमहर्षक अशा या सामन्यात हरियाणा स्टीलर्स संघाने यू मुंबा संघाचा 30-27 असा पराभव केला. या विजयाच्या रुपाने विकास खंडोला याने पुन्हा एकदा आपल्या संघासाठी सर्वाधिक 9 रेड गुण मिळवले.

यू मुंबा संघाची आजची खेळी चांगली ठरली. मात्र, त्यांना या खेळीच्या जोरावर विजय खेचता आला नाही. हरेंद्र सिंह याने विकास खंडोला याला कोणताही गुण न मिळवता बाद केले. दरम्यान, त्यानंतर विकास खंडोला याने पुनरागमन करत सुपर रेड सोबत आपले खाते उघडले. हरियाणा संघाने सातत्याने आपली गुणसंख्या वाढती ठेवण्याची कामगिरी कायम ठेवली. (हेही वाचा, बजरंग पुनिया, दीपा मलिक यांना खेलरत्न तर रवींद्र जडेजा याची अर्जुन पुरस्कारासाठी निवड)

हरियाणाने पहिल्या आर्ध्या डावापर्यंत यू मुंबा संघावर 8 गुणांनी चढाई केली. अभिषेक सिंह याने दूसऱ्या हाफमद्ये दोन सलग गुण मिळवले. या गुणांमुळे सामना फिरतो की काय अशी स्थिती निर्माण झाली. अभिषेक सिंह आणि फजल अत्राचली यांनी हरियाणा संघाला सर्वाबाद स्थानापर्यंत पोहोचवले. मात्र, शेवटच्या तीन मिनिटांमध्ये हरियाणा संघाने पुन्हा एकदा आघाडी घेत सामना खिशात घातला.