Pro Kabaddi 2019: प्रो कबड्डीच्या प्लेऑफ आणि फायनल मॅचसाठी Venue जाहीर, 19 ऑक्टोबरला होणार अंतिम सामना
प्रो कब्बडी लीगPhoto Credits: Facebook @ProKabaddi)

प्रो कबड्डी (Pro Kabaddi) 2019 च्या प्ले ऑफ आणि अंतिम सामन्यांसाठी स्थळ जाहीर केले गेले आहे. यावेळी प्ले ऑफ आणि अंतिम सामने अहमदाबाद (Ahmedabad) च्या एका अरेना (EKA Arena) इंडोर स्टेडियमवर खेळले जातील. हे सर्व सामने 14 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान होतील. सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी दोन अ‍ॅलिमिनेटर सामने खेळले जातील. तर, दुसर्‍या एलिमिनेटर सामन्यात 4 व 5 व्या स्थानावरील संघात सामना रंगेल. विश्राम दिवस मंगळवार, 15 ऑक्टोबर रोजी असेल आणि त्या दिवशी कोणतीही मॅच खेळली जाणार नाहीत. दोन्ही उपांत्य फेरीचे सामने बुधवारी 16 ऑक्टोबरला खेळविण्यात येणार आहेत. त्यानंतर गुरुवारी आणि शुक्रवारी विश्रांतीचा दिवस असेल आणि शनिवार, 19 ऑक्टोबरला या हंगामातील अंतिम सामना खेळला जाईल.

सातव्या सत्रात बंगळुरूच्या (Bengaluru) लेगमधील सध्या सामने खेळले जात आहेत. यानंतर पुणे (Pune) लेग असेल आणि त्यानंतर जयपूर (Jaipur) लेगमध्ये सामने खेळले जातील. अखेरीस, पंचकुला (Panchkula) लेग आणि ग्रेटर नोएडा (Greater Noida) लेगमध्ये आयोजन केले जाईल. यानंतर लीग स्टेजचे सामने संपतील आणि स्पर्धेतील पहिल्या 6 संघांमध्ये प्लेऑफची लढाई होईल.

गुणतालिकेवर नजर टाकल्यास दबंग दिल्लीचा संघ यावेळी 14 सामन्यांत 11 विजयांसह प्रथम स्थानावर आहे. त्याचबरोबर 3 वेळा चॅम्पियन पटना पायरेट्स संघ 14 सामन्यांत 10 पराभवांसह सर्वात खालच्या स्थानावर आहेत. तथापि, अद्याप कोणतीही संघ अधिकृतपणे या स्पर्धेतून बाहेर पडलेला नाही. प्लेऑफचे मार्ग अद्याप सर्व संघांसाठी खुले आहेत. गुणतालिकेतील केवळ पहिले 6 संघ प्लेऑफमध्ये जातील. सध्या सर्व संघांमध्ये प्रो-कबड्डीची अंतिम फेरी गाठण्यासाठी चुरस पाहायला मिळत आहे, त्यामुळे यंदाच्या हंगामात कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश मिळवतो हे पाहणं रोचक ठरणार आहे.