Tokyo Olympics 2020: नीरज चोप्रानंतर शिवपाल सिंह ने भाला फेकीत भारतासाठी मिळवला दुसरा टोकियो ऑलिम्पिक कोटा
शिवपाल सिंह (Photo CRedits: @KirenRijiju)

या वर्षाच्या शेवटी जपानमधील टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olumpics) स्पर्धेत भाला फेकणाऱ्या शिवपाल सिंह (Shivpal Singh) ने मंगळवारी भारतीय तुकडीत स्थान निश्चित केले आहे. शिवपाल दक्षिण आफ्रिकेच्या पॉचेफस्टरूममध्ये एसीएनडब्ल्यू लीगच्या बैठकीत पात्रता फेरीत यशस्वी होत शिवपालने स्थान निश्चित केलं. पहिल्या पाच थ्रोने 80 मीटरचा टप्पा ओलांडल्यावर पाचव्या प्रयत्नात शिवपालने 85.47 मीटर अंतरावर भाला फेकला. टोकियोमध्ये आयोजित होणाऱ्या गेम्ससाठी पात्र ठरलेल्या नीरज चोप्रा (Neeraj Chopra) नंतर तो दुसरे भाला फेकणारा आणि ट्रॅक आणि फील्डमधील 9 वा भारतीय खेळाडू आहे. नीरजने गेल्या आठवड्यात एसीएनडब्ल्यू लीगच्या पात्रता फेयरत 87.86 मीटर थ्रो केला होता आणि पहिल्या ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. ऑलिम्पिक पात्रता मार्क 85 मीटर आहे. गेल्या वर्षी दोहा येथे होणाऱ्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरलेल्या 24 वर्षीय शिवपालला हा निकाल सकारात्मक ठरला.

नंतर वुहानमधील वर्ल्ड मिलिटरी गेम्समध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले. त्याचा वैयक्तिक बेस्ट थ्रो 86.23 मीटर आहे. शिवपालने पात्रता फेरीत यशस्वी कामगिरीबद्दल क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी त्याचे अभिनंदन केले. परंतु, अर्शदीप सिंहने 75.02 मीटरची सर्वोत्तम कामगिरी बजावली, मात्र शिवपालसह पात्रता मिळवण्यास अपयशी ठरला.

महिला स्पर्धेत 61.15 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोनंतर अन्नू रानीही पात्रता मिळवण्यास अपयशी ठरली. महिला भाला फेकमध्ये पात्रता मार्क 64 मीटर आहे.