Jyothi Vennam (PC - ANI/Twitter)

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पुन्हा एकदा झेंडा फडकवला आहे. भारताच्या ज्योती वेन्नम (Jyothi Vennam) ने तिरंदाजीत (Archery) सुवर्णपदक पटकावले आहे. महिलांच्या कंपाऊंड स्पर्धेत ज्योती वेन्नमने दक्षिण कोरियाच्या सो चाईचा १४९-१४५ असा पराभव केला. सुवर्णपदक जिंकून ज्योतीने देशाच्या शिरपेचार मानाचा तुरा रोवला आहे. याशिवाय अदिती स्वामीने कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. ओजस देवतळे याने कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीतही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याने अभिषेक वर्माचा १४८-१४७ असा पराभव केला. या स्पर्धेत भारताने सुवर्ण आणि रौप्य पदकांवर कब्जा केला आहे.

विश्वचषकात सुवर्णपदक जिंकणाऱ्या ज्योती स्वामीचे हे तिसरे वैयक्तिक पदक आहे. त्यांनी अनेक प्रसंगी भारताचा गौरव केला आहे. आजचा दिवस भारतासाठी देखील खास आहे कारण हे भारताचे सातवे आणि कंपाऊंडमधील 5वे सुवर्ण पदक आहे. प्रत्येक गटात देशाने बाजी मारली आहे. (हेही वाचा - India Beat Japan: भारतीय संघाने पुरुष हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावले, अंतिम फेरीत जपानला केले पराभूत)

1975 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच आधुनिक तिरंदाजीचा समावेश करण्यात आला. त्यानंतर भारताने प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत आपला झेंडा फडकवला आहे. भारताने सर्वाधिक 9 पदके जिंकली आहेत. भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिष्ठा उंचावत आहेत. भारताचा स्कोअर बोर्ड इतर देशांच्या तुलनेत खूप पुढे आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण 97 पदके जिंकली आहेत. भारताने आतापर्यंत 23 सुवर्ण, 34 रौप्य आणि 40 कांस्यपदक मिळवले आहेत. भारत शतकाचा टप्पा अगदी आरामात पार करणार आहे.