Coronavirus: 2022 बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्सच्या तारखांमध्ये बदल, 'या' दिवसापासून होणार आयोजन, जाणून घ्या
2022 राष्ट्रकुल खेळ,

कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने (Commonwealth Games Federation) 2022 मध्ये बर्मिंघम (Birmingham) येथे होणाऱ्या राष्ट्रकुल खेळाच्या (Commonwealth Games) तारखांमध्ये एक दिवसाने बदल केला आहे. पूर्वी हे खेळ 27 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान खेळले जाणार होते, परंतु आता या खेळांचे आयोजन 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान केले जाईल. सीजीएफने एका निवेदनात म्हटले आहे की, "सीजीएफ आणि बर्मिंघम 2022 आयोजन समितीची ही संयुक्त घोषणा कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनदर्शिकेत बदल झाल्यामुळे झाली आहे." कोविड-19 मुळे टोकियो ऑलिम्पिक आणि 2021 पासून अमेरिकेतील वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपला एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आलेले असल्याने आयोजकांनी हे पाऊल उचलले आहे. बर्मिंघम 2022च्या क्रीडा इतिहासातील पहिल्यांदा असे खेळ खेळले जातील ज्यात महिलांनी पदक जिंकण्याची शक्यता जास्त असेल. सीजीएफचे अध्यक्ष डेम लुइस मार्टिन म्हणाले की, "या कठीण परिस्थितीत कॉमनवेल्थ गेम्स होऊ शकतील यासाठी आम्ही भागीदारीत काम करत आहोत याचा आम्हाला आनंद आहे." (Coronavirus: भारतीय खेळाडूंना झटका, गोवामध्ये होणारे 36 वे राष्ट्रीय खेळ कोरोनामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित)

नुकत्याच झालेल्या पुन्हा शेड्यूल केलेल्या यूईएफए महिला फुटबॉल स्पर्धेच्या वेळापत्रकातील संभाव्य सेमीफायनल तारखांचा संघर्ष टाळण्यासाठी उद्घाटन कार्यक्रमाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. बर्मिंघम -2022 चे अध्यक्ष जॉन क्रैबेट्री म्हणाले की, “कोविड-19 चा पुढील काही वर्ष आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स कॅलेंडरवर परिणाम होईल. गोष्टी पुन्हा तयार केल्या पाहिजेत आणि बर्मिंघम 2022, खेळाडू, दर्शक आणि टीव्हीवर पाहणारे लोक, आमचे भागीदार याबद्दलचे बदल काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही इतर संस्थांसह काही आठवडे घालवले आहेत."

दरम्यान, 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकसह जागतिक महामारीने क्रीडा कॅलेंडरमध्ये काही बदल करण्यास भाग पाडले गेले. याचा अर्थ 2021 वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, यूईएफए महिला फुटबॉल चँपियनशिप आणि इतर काही कार्यक्रम 2022 मध्ये हलविण्यात आले आहेत.