दालिलाह मुहम्मद (Photo Credit: Dalilah Muhammad/Twitter)

दालिलाह मुहम्मद (Dalilah Muhammad), या अमेरिकेच्या स्टार अ‍ॅथलीटने अमेरिकन चॅम्पियनशिप (US Championships) दरम्यान महिलांच्या 400 मीटर अडथळ्यांचा विश्वविक्रम मोडला. दलिलाने रविवारी, चॅम्पियनशिपच्या शेवटच्या दिवशी 52.20 सेकंदांसह नवीन विक्रम नोंदविला. तिने 2003 मध्ये रशियाची धावपटू युलिया पेचोंकिना (Yuliya Pechonkina) यांनी तयार केलेला विक्रम 0.14 सेकंदांच्या फरकाने मोडला. रिओ ऑलिम्पिक खेळात सुवर्णपदक जिंकणारी दलीलाहने चौथ्या लेनपासून सुरुवात करून या विक्रमाची नोंद केली. दालिलाहसह 2015 वर्ल्ड रजतपदक विजेता शेमियर लिटिल (Shamier Little)आणि वर्ल्ड अंडर-20 रेकॉर्ड धारक सिडनी मॅकलॉलीन (Sydney McLaughlin) आणि ऍशली स्पेन्सर (Ashley Spencer) सुद्धा या स्पर्धेत सहभागी झाले होते.

विश्वविक्रम केल्यानंतर दालिलाह म्हणाली की,"मलाही आश्चर्य वाटले. माझे कोच मला रेकॉर्ड सांगत होते. मला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून त्यासाठी जायचे होते. मला ते इतक्या वाईटपणाने हवे होते की मला तिथे जायचे होते आणि स्वत: ला सिद्ध करावे लागेल हे मला ठाऊक होते."

मॅकलॉलेनने ही शर्यत 52.88 सेकंदात पूर्ण केली तर स्पेन्सरने 53.11 सेकंदांसह तिसरे स्थान पटकावले. 29 वर्षीय दालिलाह मोहम्मदचा जन्म जमैका (Jamiaca) येथे झाला होता. पण काही वर्षांनी ती आई-वडिलांसह अमेरिकेला आली आणि इथेच आपली कारकीर्द बनविली.