बॅडमिंटन खेळणाऱ्या महान शटलर ली चोंग वेई (Lee Chong Wei) ने गुरुवारी या खेळातून निवृत्ती जाहीर केली. गेल्यावर्षी वेईला नाकाशी संबंधित कर्करोग (Cancer) झाल्याचे निदान झाले होते त्यामुळे तो काही काळ बॅडमिंटन खेळू शकला नव्हता. निवृत्तीची घोषणा करताना ली बराच भावुक झालेला दिसला.
ली म्हणाला, "मी भारी मानाने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मला हा खेळ खूप आवडतो पण,खेळासाठी भूपच वेळ द्यावा लागत असतो जे मी नाही करू शकत. गेल्या 19 वर्षांत मला समर्थन आणि पाठिंबा देण्यासाठी सर्व मलेशियाईंचे आभार मानतो. " ली ने आपली खेळातून निवृत्तीची घोषणा करताच, भारतीय बॅडमिंटन राणी सायना (Saina Nehwal) नेहवाल ने ट्विटर (Twitter) द्वारे आपल दुःख व्यक्त केलं शिवाय ली ना पुढचा वाटचालीसाठी सुभेक्षा हि दिल्या."बर्याच वर्षांपासून मला तुमचा खेळ खूपच आवडायचा… तुम्ही बॅडमिंटन मधले एक महान खेळाडू आहेत आणि हे जाणून घेणे खूप दुःखद आहे की तुम्ही निवृत्त होताहात... मी भविष्यासाठी आपल्याला शुभेच्छा देते आणि कृपया आपल्या आरोग्याची काळजी घ्या ".
ली यांनी ३ ऑलिम्पिक (Olympic) सुवर्ण पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. तसेच निवृत्ती नंतर, ली ना आता आपल्या घरच्यां बरोबर वेळ घालवायचा आहे, शिवाय त्यांना आपल्या पत्नीला 'हनीमून' वर घेऊन जायचं आहे जे कि ते 2012 मध्ये विवाह नंतर सतत ते टाळत होते.