Ind vs WI: पृथ्वी शॉच्या शतकी खेळीनंतर सचिन तेंडुलकरने केले कौतुक
सचिन तेंडुलकर Photo PTI (File Photo)

अंडर 19 चा विश्वकप जिंकल्यानंतर आता पृथ्वी शॉ पुन्हा चर्चेमध्ये आला आहे. भारत विरूद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यांमध्ये पृथ्वी शॉचा समावेश झाल्यानंतर सार्‍यांच्याच त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या होता. पृथ्वी शॉदेखील क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा पूर्ण करता नवे विक्रम रचत आहे.

भारताचा युवा खेळाडू पृथ्वी शॉने पहिल्याच कसोटी सामन्यात दणदणीत शतक ठोकलं आहे. 98 बॉलमध्ये त्याने 100 धावांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर पृथ्वीवर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे.

सचिनने केले पृथ्वीचं कौतुक

 

सचिन तेंडुलकरने ट्विटरच्या माध्यमातून पृथ्वीचं कौतुक केले आहे. ट्विटरवर पृथ्वीला शुभेच्छा देताना क्रिकेटच्या मैदानावर तुझी तुफान खेळी पाहण्याचा आनंद फार छान आहे. असाच खेळत रहा. असे सचिनने म्हटले आहे.