(Photo Credits-Getty Image)

आयसीसी (ICC) विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजच्या आपल्या अंतिम सामन्यात भारतीय संघ श्रीलंका विरुद्ध दोन हात करेल. भारत (India)-श्रीलंका (Sri Lanka) मधील हा सामना अत्यंत रोमांचक होणार आहे. आयपीएल (IPL) मध्ये मुंबई इंडियन्स साठी कित्येक वर्ष एकत्र खेळलेले रोहित शर्मा (Rohit Sharma), लसिथ मलिंगा (Lasith Malinga), हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आमने-सामने असतील. या सामन्यात सर्वांचे लक्ष असेल ते मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ची यॉर्कर जोडी, मलिंगा आणि बुमराह. या मॅचआधी मलिंगाने बुमराहबद्द्दल एक मोठे विधान केलेत.  (IND vs SL विश्वचषक मॅचआधी के एल राहुल सांगतोय कशी आहे टीम इंडियाची तयारी, पहा Video)

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना, बमुराला मलिंगाकडून त्याच्या गोलंदाजीच्या शैलीबद्दल नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. मलिंगा म्हणाला, यॉर्कर नाही तर बुमराहची अचूकता धोकादायक गोलंदाज बनवते. मलिंगा म्हणाला बुमराह बद्दलची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे त्याला त्याच्या क्षमतेवर विश्वास आहे जेणेकरून मोठ्या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करण्यास त्याच्यावर दबाव पडणार नाही. "तणाव म्हणजे काय? तणाव म्हणजे आपल्याकडे योग्यता नाही. जर आपल्याकडे पात्रता असतील तर तुम्ही तणावाखाली येऊच शकत नाही. जर तुम्ही अचूक असाल तर तुम्हाला माहित आहे की तुम्ही काय करू शकता तर काही त्रास नाही. बुमराह उत्तम गुणवत्तेचा गोलंदाज आहेत आणि त्याला माहित आहे की तो एक प्रकारचा बॉल सतत करू शकतो."

"मी त्याला (बुमराह) 2013 मध्ये पहिल्यांदा पाहिले आणि त्याच्याबरोबर वेळ घालवला. तो शिकण्याकरिता भुकेलेला होता आणि लवकर शिकण्यातला आहे. शिकण्याची भूक फार महत्वाची आहे. थोड्या काळामध्ये बुमराहने आपले कौशल्य दाखविले आहे."

दरम्यान, मलिंगाचे मत आहे की, सध्याचा भारतीय संघ 2011 च्या विश्वचषक इतिहासाची पुनरावृत्ती करू शकतो. मलिंगाच्या मते, भारतीय संघाकडे अनुभवी खेळाडू आहे. रोहित सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आणि विराट कोहली (Virat Kohli) आगामी सेमीफायनल किंवा फायनलमध्ये आपला पहिला शतक करू शकतो.