IND vs SL विश्वचषक मॅचआधी के एल राहुल सांगतोय कशी आहे टीम इंडियाची तयारी, पहा (Video)

भारत-श्रीलंकाविरुद्ध मॅचआधी सामन्याआधी बीसीसीआयने टीमचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारताचा सलामीवीर के एल राहुल अंतिम ग्रुप स्टेज सामन्याआधी टीमची मनःस्थिती, त्यांचे प्रशिक्षण सत्राबद्दल माहिती दिली आहे.

IND vs SL विश्वचषक मॅचआधी के एल राहुल सांगतोय कशी आहे टीम इंडियाची तयारी, पहा (Video)
(Photo by Henry Browne/Getty Image)

इंग्लंड (England) मध्ये सुरु असलेलं आयसीसी (ICC) विश्वचषक आपलूं अंतिम चरणी येऊन पोहचला आहे. सेमीफाइनलसाठी 4 संघ जवळपास निश्चित झाले आहेत. यात ऑस्ट्रेलिया (Australia), भारत (India), इंग्लंड आणि न्यूझीलंड (New Zealand) संघ शामिल आहेत. विश्वचषकमधील सेमीफायनल सामने 9 आणि 11 जुलै जाणार आहे. मात्र, त्याआधी ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाचे ग्रुप स्टेजमधील एक-एक सामने उरले आहेत. ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिका (South Africa) तर टीम इंडिया श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध दोन हात करेल. (ICC World Cup 2019: विश्वचषक सेमीफायनलमध्ये टीम इंडिया पुन्हा एकदा दिसणार ऑरेंज जर्सीमध्ये दिसणार?)

भारत-श्रीलंकाविरुद्ध मॅचआधी टीम इंडिया हेडिंग्ले (Headingley) मैदानावर घाम गळताना दिसतेय. या सामन्याआधी बीसीसीआय (BCCI) ने टीमचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारताचा सलामीवीर के एल राहुल (KL Rahul) टीमच्या अंतिम ग्रुप स्टेज सामन्याआधी टीमची मनःस्थिती, त्यांचे प्रशिक्षण सत्राबद्दल माहिती दिली आहे. व्हिडिओ शेअर करताना बीसीसीआयने लिहिले, "सामन्यापूर्वी टीम इंडिया काय करत आहे? के. एल रहुल देतोय तपशील".

बांगलादेश (Bangladesh) संघाला पराभूत करून टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया 14 गुणांसह पहिल्या स्थानावर तर भारत 13 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. विश्वचषकमधील पहिले सेमीफायनल 9 जुलैला मॅन्चेस्टर (Manchester) वर होईल. त्यानंतर दुसरा सामना 11 जुलैला एजबस्टन (Edgbaston) येथे खेळाला जाईल. आणि अंतिम सामना इंग्लंडच्या प्रतिष्ठित लॉर्ड्स (Lords) मैदानवर 14 जुलैला होणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 05, 2019 11:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).