IND vs NZ, ICC World Cup 2019 Live Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर
Image Source/PTI

IND vs NZ, ICC Cricket World Cup 2019: आईसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 मधील 14 वा सामना आज भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात इंग्लंडच्या ट्रेंट ब्रिज (Trent Bridge Cricket Ground) ग्राऊंडवर रंगणार आहे. किवी संघ सध्या तीन विजया सह ICC  गुणतालिकेत अव्वल स्तनावर आहे तर भारत 2 सामने जिंकून तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने आपले पहिल्या दोन सामन्यात, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केले आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडने आपले तिन्ही सामने जिंकले आहे, त्यामुळे त्यांची विजयी खेळी रोखण्याचा भारत नक्कीच प्रयत्न करेल. (IND vs NZ, ICC Cricket World Cup 2019: ह्या 5 खेळाडूं मधील Battle ठरेल मुख्य आकर्षण)

दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच लढतीमधील चार सामने भारताने जिंकले असून एका सामन्यामध्ये न्यूझीलंड जिंकला आहे. दोन्ही संघांदरम्यान विश्वचषकामध्ये आतापर्यंत 7 सामने झाले असून यातील 4 सामन्यांमध्ये न्यूझीलंडन, तर तीन सामने भारताने जिंकले आहेत.

भारताने आतापर्यंत दोन वेळा विश्वचषक जिंकला असून न्यूझीलंड एकदा उपविजेता राहिला आहे.

भारत-न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघात आज लढत होणार आहे. हा सामन्याचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तसंच वर्ल्डकप मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड संघाचा सामना तुम्ही ऑनलाइन HOTSTAR आणि STAR SPORTS वर पाहु शकता.

भारत विरुद्ध न्यूझीलंड नाणेफेक: 

 

असे असतील संघ: