(Photo Credits: Instagram)

विश्वकपमध्ये पाकिस्तान (Pakistan) संघ सध्या चर्चेत आहे. बबर आझाम (Babar Azam) ने नाबाद शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने न्यूझीलंड (New Zealand) चा 6 गडी राखून विजय मिळवला. या विजया सह आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वकपच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याची त्यांची आशा अजून बनली आहे. न्यूझीलंड विरुद्ध हा विजय पाकिस्तानी संघासाठी महत्वाचा होता. या सामन्यात पराभूत झाले असता पाकिस्तान चा दुसऱ्यांदा विश्वकप जिंकण्याचे स्वप्न, स्वप्नच बनून राहिले असते. (India vs West Indies Live Cricket Streaming on DD Sports and Prasar Bharati Sports for Free: रेडिओ वर लुटा IND vs WI मॅच चा LIVE आनंद)

पाकिस्तान च्या विजयानंतर भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) ने टीम चे अभिनंदन करत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. सानिया म्हणते, 'विश्वास बसणार नाही इतक्या महान पातळीवर खेळ होता.' मात्र, चाहत्यांनी तिच्या या ट्विटवर पती शोएब मलिक (Shoaib Malik) चे सामन्यात ने खेळण्यासाठी आभार मानले.

कपमध्ये सध्या पाकिस्तानच्या संघासाठी 'करो या मरो' अशी अवस्था झाली आहे. सेमीफाइनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना आपले उर्वरित सामने जिंकावे लागणार आहे. पाकिस्तानचे विश्वकप मध्ये दोन सामने उरले आहे. पाकिस्तानी संघ बांगलादेश (Bangladesh) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्या विरोधात जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. तसेच, भारताच्या सामन्यांवरही त्यांची नजर असेल. जर, भारत इंग्लंड (England) किंवा बांगलादेश यांच्याविरोधात सामन्यात पराभूत झाला तर, पाकिस्तान संघाचे सेमीफायनलचे स्वप्न धुळीस मिळेल. त्यामुळे पाकिस्तान चाहते आता भारतीय संघ सर्व सामने जिंकू देत अशी प्रार्थना करतील.