(Photo Credits: Instagram@sudhir10dulkar/ANI)

भारतीय संघ सध्या आयसीसी (CC) विश्वकपमध्ये चांगल्या कामगिरी ने चाहत्यांची मनं जिंकत आहे. भारतीय संघ जितका सध्या चर्चेत आहे तितकीच त्यांची जर्सी ही चर्चेचा विषय बनली आहे. आयसीसी च्या नियम नुसार दोन संघ सामन्यात एक सारखी जर्सी घालू शकत नसल्याच्या नियमामुळे टीम इंडिया यजमान इंग्लंड (England) विरुद्ध च्या सामन्यादरम्यान ऑरेंज रंगाची जर्सी घालणार असल्याचे म्हटले जात आहे. ही बातमी कळताच टीम इंडियाची जर्सी कशी असेल यावर सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. (IND vs ENG मॅचसाठी भारतीय संघ होणार 'केशरी'; Team India वरही भगव्या रंगाची छाप असल्याचा Netizens चा सूर)

या चर्चेला पूर्णविराम देत सुधीर कुमार चौधरी (Sudhir Kumar Chaudhary) म्हणजेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि रन मशीन विराट कोहली (Virat Kohli) च्या चाहत्याने आपल्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर या जर्सी चा फोटो शेअर केला आहे. या जर्सीचा फोटो शेअर करत सुधीर लिहितो, 'ही अशी आहे टीम इंडिया ची ऑरेंज जर्सी? चाहत्यांनी नाईकी स्टोअरमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे आणि असे दिसते आहे की हीच जर्सी भारत, इंग्लंडविरुद्ध सामन्यात परीधान करणार.'

या जर्सी चा फोटो सोशल मीडियावर सध्या वायरल होत आहे. मात्र, बीसीसीआय किंवा भारतीय संघाकडून या बाबत कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही आहे. भारत (India) आणि इंग्लंड संघाच्या जर्सीचा रंग निळा असल्या कारणाने भारतीय संघ यजमान देश विरुद्ध खेळताना ऑरेंज जर्सी परिधान करेल असे बोलले जात आहे.