युसूफ पठाण (Photo Credit: VideoScreenGrab/Twitter)

भारताचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) आणि युसूफ पठाण (Yusuf Pathan) यांनी देशातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर 4,000 हुन अधिक मास्क दान देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून 29 कसोटी आणि 120 वनडे सामने खेळणार्‍या इरफानने युसूफला टॅग करत ट्विट केले की, “समाजासाठी योगदान देत आहेत. जे लोकं असं करु शकतात, कृपया त्यांनी पुढे या आणि एकमेकांना मदत करा पण गर्दी जमा होऊ देऊ नका. ही एक छोटी सुरुवात आहे आशा आहे की आम्ही अधिक मदत करत राहू." केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात कोविड-19 रुग्णांची संख्या 430 च्या पुढे गेली आहे. जगभरात मृत्यूची संख्या जवळपास 15,000 इतकी असून 350,000 प्रकरणे पुष्टी करण्यात आली आहे. देशभरात कोरोना ग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना अनेक भारतीय राज्यांमध्ये संचारबंदी घोषित केली गेली आहे. (इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने केली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी? 2014 मधील ट्विट सोशल मीडियात व्हायरल)

इरफानने एका व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे की त्याने आणि त्याच्या भावाने मेहमूद खान पठाण चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने मास्क खरेदी केले आहेत. ही ट्रस्ट त्यांचे वडील चालवतात. इरफान म्हणाला हे मास्क वडोदराच्या आरोग्य विभाग आणि गरजूंना वाटले जातील. पाहा व्हिडिओ:

कोरोनामुळे आजवर भारतात 8 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि सतत नवीन रुग्णांची नोंद केली जात आहेत. भारतात अनेक शहरांत लॉकडाऊन घोषित केले असल्याने केंद्र सरकारने राज्यांना विविध शहरांमध्ये कडक बंदोबस्त लागू करण्यास सांगितले आहे. शिवाय, लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला केंद्राने राज्यांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लॉकडाऊन गंभीरपणे घ्यावे आणि स्वतः सोबत त्यांच्या कुटुंबियांचे रक्षण करावे असे आवाहनही केले आहे.