
RCB vs PBKS IPL 2025 Final: आयपीएल 2025 चा फायनल आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यात होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. यावेळी दोन्ही संघांपैकी एक संघ पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकणार आहे. आज दोन्ही संघ आपापल्या खेळाडूंसह पूर्ण तयारीने मैदानात उतरतेल. दुसरीकडे मात्र, युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) खेळण्यावर सस्पेन्स आहे. चहलसाठी हा हंगाम संमिश्र राहिला आहे. चहलने या हंगामात हॅटट्रिक देखील घेतली आहे.
दुखापतीमुळे चहल 2 सामन्यांमधून बाहेर पडला होता, त्यानंतर तो क्वालिफायर 2 मध्ये परतला पण चहलची कामगिरी तितकी खास नव्हती. मुंबई इंडियन्सविरुद्ध गोलंदाजी करताना चहलने 4 षटकांत 39 धावा देत 1 बळी घेतला. अशा परिस्थितीत चहलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते.
चहलला दोनदा फायनलचा अनुभव
आयपीएलच्या इतिहासात युजवेंद्र चहलने वेगवेगळ्या संघांसाठी दोनदा अंतिम फायनलचा सामना खेळला आहे. मात्र, दोन्ही वेळा संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. युजवेंद्र चहलने आयपीएल 2016 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून अंतिम सामना खेळला होता आणि आरसीबीला सनरायझर्स हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात गोलंदाजी करताना चहलने 39 धावांत 1 बळी घेतला. यानंतर, चहलने आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून अंतिम सामना खेळला आणि राजस्थानलाही पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात चहलने 4 षटकांत 20 धावा देत 1 बळी घेतला. आता चहल तिसऱ्यांदा पंजाब किंग्जकडून अंतिम सामना खेळू शकतो.
चहलच्या जागी या खेळाडूला संधी मिळेल!
हरप्रीत ब्रारला चहलच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. हरप्रीत गेल्या अनेक सामन्यांपासून पंजाब किंग्जकडून सतत खेळत आहे आणि त्याच्या गोलंदाजीने तो विराट कोहली आणि रजत पाटीदार सारख्या खेळाडूंना त्रास देऊ शकतो. याशिवाय, वेळ आल्यावर हरप्रीत थोडी फलंदाजी देखील करू शकतो.