Sachin Tendulkar याला भेटल्यावर  Yuvraj Singh याला करायची नव्हती अंघोळ, सांगितला पहिल्या भेटीच्या आठवणीतील किस्सा, पाहा Video
सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंह (Photo Credit: Getty)

सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) उपस्थितीत भारतीय क्रिकेटपटू म्हणून सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणींना भारताचा माजी षटकार किंग युवराज सिंहने (Yuvraj Singh) उजाळा दिला. युवीने भारतीय जर्सीमध्ये डेब्यू केले तेव्हा सचिनने सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि खेळाचा एक महान खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. युवीने 2000 मध्ये आयसीसी नॉकआउट ट्रॉफीद्वारे (ICC Knockout Trophy) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वर्षाच्या सुरुवातीला अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या मोहिमेतून बाहेर पडलेला युवराज झहीर खानसमवेत भारतासाठी पदार्पण करीत होता. आयकॉनिक फलंदाजाशी झालेल्या पहिल्या भेटीत युवराजने सचिनच्या उपस्थितीने कसा भारावून गेला हे सांगितले. नेटफ्लिक्सवर ‘Stories Behind the Story’ या नावाने अपलोड करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये युवराजने भारतीय संघातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. (आयपीएलमधील 'त्या' घटनेमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर झाले अस्वस्थ; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत आयसीसीसह सर्व क्रिकेट बोर्डांना केली विनंती)

युवराज म्हणाला, “2000 मध्ये मी भारताकडून पदार्पण केले. मी अंडर-19 विश्वचषक खेळल्यानंतर त्याच फ्लोमध्ये पुढे गेलो, मला माझ्या आदर्श खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळाली होती. तेंडुलकर, गांगुली, द्रविड, अनिल कुंबळे, श्रीनाथ - संघातील मोठे खेळाडू आणि अचानक मी ‘मी कुठे आलो आहे,’ सारखा होतो.” सचिनबरोबर पहिल्या भेटीची आठवण सांगताना युवी म्हणाला, “मी माझ्या वर्गात बॅकबेंचर होतो, मी बसमध्ये बॅकबेंचर होतो. ज्या क्षणी तो आत आला, तो आला आणि त्याने माझ्याशी, झहीर खान, विजय दहिया, नवीन लोकांशी हातमिळवणी केली. मला आठवते जेव्हा तो मागे वळाला आणि त्याच्या जागेवर जाऊन बसला, तेव्हा मी माझे हात माझ्या संपूर्ण शरिरावर फिरवले होते. तेव्हा मी सचिनबरोबर हात मिळवला होता, म्हणून मला अंघोळही करायची इच्छा नव्हती.”

पहिल्या पाच प्रयत्नात वर्ल्ड कप जिंकण्यात अपयशी ठरलेल्या सचिनचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नपूर्ण करण्यासाठी 2011 मध्ये कसे परिश्रम घेतले हे देखील सांगितले. 1992 मध्ये सचिनने विश्वचषक स्पर्धेत पदार्पण केले आणि 1999, 1999, 2003 व 2007 च्या आवृत्तीत भारताचे नेतृत्व केले. “2011 हा त्यांचा अखेरचा विश्वचषक होता आणि त्याला हे माहित होते. तो जवळजवळ 22 वर्षे भारतीय क्रिकेटचे वजन खांद्यावर घेत होता आणि आम्हाला त्याला एक समाधानकारक कारकीर्द द्यायची इच्छा होती जिथे शेवटी त्याने एक वर्ल्ड कप जिंकला होता. आमच्यासाठी हा एक सांघिक प्रयत्न होते जे आम्हाला सचिनसाठी करायचे होते.”