Sachin Tendulkar's Tweet: आयपीएलमधील 'त्या' घटनेमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर झाले अस्वस्थ; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत आयसीसीसह सर्व क्रिकेट बोर्डांना केली विनंती
Sachin Tendulkar (Photo Credits: IANS)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युएईमध्ये (UAE) खेळवण्यात येत असलेली इंडियन प्रीमिअर लीगचा (Indian Premier League) तेरावा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. आयपीएल 2020 मध्ये चाहत्यांना अनेक चुरशीचा लढती पाहायला मिळाल्या आहेत. एवढेच नव्हेतर क्रिकेटच्या इतिहासातील पहिली डबल सुपर ओव्हरचा सामना देखील या हंगामात पाहायला मिळाला आहे. मात्र, या हंगामातील एका घटनेबाबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच खेळाडूंच्या सुरक्षेबाबत आयसीसीसह सर्व क्रिकेट बोर्डांना त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महत्वाची विनंती केली आहे.

नुकताच सचिन तेंडूलकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात सनरायजर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर जखमी होण्यापासून थोडक्यात बचावल्याचे दिसत आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या एक धाव चोरत असताना निकोलस पूरनने विकेटच्या दिशेने फेकला होता. मात्र, त्याने फेकलेला चेंडू विजयच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. परंतु, हेल्मेट असल्यामुळे विजयला कोणतीही दुखापत झाली नाही. यामुळे सर्व खेळाडूना हेल्मेट घालणे किती गरचेचे आहे, याचे महत्व सचिन तेंडूलकर यांनी या व्हिडिओतून पटवून दिले आहे. तसेच आयसीसीसह अन्य सर्व देशातील क्रिकेट बोर्डांनी खेळाडूंना हेल्मेट घालणे सक्तीचे करावे, अशी विनंती केली आहे. हे देखील वाचा- Fantasy Leagues Apps: फॅन्टेसी लीग अ‍ॅप संदर्भात सौरव गांगुली, विराट कोहली यांना मद्रास उच्च न्यायालयाकडून नोटीस

सचिन तेंडूलकर याचे ट्विट-

क्रिकेट हा खेळ दिवसेंदिवस रोमांचक होत चालला आहे. क्रिकेटमध्ये आता अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. परंतु, खेळाडूंची सुरक्षादेखील अधिक महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांत अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यामुळे खूप काही वाइट घडण्याची शक्यता होती. यामुळे वेगवान गोलंदाज असू किंवा फिरकीपटू फलंदाजांना हेल्मेट घालणे हे सक्तीचे केले पाहिजे. मी आयसीसीला विनंती करतो की हा नियम लवकरात लवकर क्रिकेटमध्ये लागू करावा, अशा आशयाचे ट्विट सचिन तेंडूलकर यांनी केले आहे.