टी-20 मधील सर्वात जलद अर्धशतकाचा रेकॉर्ड कोण मोडणार? माजी सिक्सर किंग युवराज सिंह ने स्वतःचा विक्रम मोडण्यासाठी घेतली दोन नावं
युवराज सिंह (Photo Credits: Getty Images)

अलीकडेच भारतीय क्रिकेट संघाचा स्टायलिश फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याला युवराज सिंह (Yuvraj Singh) याचा सर्वात वेगवान टी-20 अर्धशतकाच्या (Fastest T20 Fifty) रेकॉर्ड कोण मोडू शकतो. ट्विटरवर या चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुलने स्वतःचे नाव घेतले, पण आता युवराजने स्वत: या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. हा विक्रम मोडणार्‍या खेळाडूसाठी युवराजने हार्दिक पंड्याची (Hardik Pandya) निवड केली आहे. हार्दिक हा सध्याच्या भारतीय क्रिकेट संघातील एक खेळाडू आहे जो आपला वेगवान टी-20 अर्धशतकाचा विक्रम मोडू शकतो असे युवीला वाटते. युवीने फलंदाजी करताना जे विक्रम रचले ते अद्याप अबाधित आहेत आणि आजवर कोणताही खेळाडू त्याच्या विक्रमापर्यंत पोहोचू शकलेला नाही. युवराजने 2007 मध्ये खेळलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध अवघ्या 12 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. या सामन्यात युवीने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये सहा षटकार ठोकले होते, जे आजही एक विश्व रेकॉर्ड आहे. युवराजने या सामन्यात तीन चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 58 धावांची शानदार अर्धशतक झळकावत केवळ 16 चेंडूंचा सामना केला. (रैना और हिटमॅन जैसे गाल हो जाएंगे! युजवेंद्र चहल ने अरेंज मॅरेजवर टिप्स विचारल्यानंतर युवराज सिंह ची अफलातून प्रतिक्रिया पाहून तुमहालाही फुटेल हसू)

युवराज हार्दिकचे कौतुक करत म्हणाला, हार्दिक एक अष्टपैलू खेळाडू होण्याच्या मार्गावर आहे. परंतु आपल्याला संघात असा खेळाडू पाहिजे जो त्याला योग्य मार्ग दाखवू शकेल. हार्दिक शिवाय युवीने संघाचा युवा सलामी फलंदाज राहुलचेही नाव घेतले. राहुलही त्याचा विक्रम मोडू शकतो असे युवीला वाटते. युवराजचा हा विक्रम मोडीत काढण्यासाठी जगातील अनेक फलंदाज जवळ पोहचले पण त्यांना अपयश आले. युवराजच्या विक्रमाच्या सर्वात जवळचा खेळाडू ऑस्ट्रियाचा मिर्झा एहसान होता. एहसानने 2019 मध्ये लक्समबर्ग विरुद्ध 13 चेंडूत 2 चौकार आणि 7 षटकारांसह ही कामगिरी केली.

दुसरीकडे, टेस्ट प्लेइंग नेशन्स खेळाडूंमध्ये किवी फलंदाज कॉलिन मुनरो युवराजच्या विक्रमापासून 2 पाऊल दूर राहिला. 2016 मध्ये श्रीलंकेविरुद्ध ऑकलंडमध्ये त्याने 14 बॉलचे अर्धशतक झळकावले होते.