रैना और हिटमॅन जैसे गाल हो जाएंगे! युजवेंद्र चहल ने अरेंज मॅरेजवर टिप्स विचारल्यानंतर युवराज सिंह ची अफलातून प्रतिक्रिया पाहून तुमहालाही फुटेल हसू
टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन्सवर भाष्य करण्याचा आपला ट्रेंड कायम ठेवला आणि रैना आणि रोहित यांच्यातील संवाद दरम्यान एक मजेदार प्रतिक्रिया दिली. चहलने दोन्ही खेळाडूंना अरेंज मॅरेजवर काही टिप्स विचारल्या. चहलची टिप्पणी पाहून युवराज सिंहने ही या मजेमध्ये सामील झाला आणि हास्यास्पद प्रत्युत्तराने रोहित आणि रैनाला ट्रोल केले.
टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) लॉकडाउनमध्ये चाहत्यांचे पूर्णपणे मनोरंजन करत आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्व क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्यामुळे भारतीय क्रिकेटर्स-रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली, सुरेश रैना (Suresh Raina) आणि इतर बरेच आपला अधिक वेळ सोशल मीडियावर व्यतीत करत आहेत. इंस्टाग्राम लाइव्हचा ट्रेंड सुरू ठेवत रैना आणि रोहितही एका संवादात सामील झाले आणि यात दोघांनी विविध विषयांवर चर्चा केली.आणि, गेल्या काही दिवसांत पाहिल्याप्रमाणे, चहलही या इन्स्टाग्राम लाइव्ह सत्रात सामील झाला. चहलने इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन्सवर भाष्य करण्याचा आपला ट्रेंड कायम ठेवला आणि रैना आणि रोहित यांच्यातील संवाद दरम्यान एक मजेदार प्रतिक्रिया दिली. रैना आणि रोहित आधीच लग्न झालेले असल्याने चहलने दोन्ही खेळाडूंना अरेंज मॅरेजवर काही टिप्स विचारल्या. “किंवा अरेंज मॅरेजविषयी काही सूचना” चहलने लाईव्ह सत्रा वेळी कमेंट केली. चहलची टिप्पणी पाहून युवराज सिंहने (Yuvraj Singh) ही या मजेमध्ये सामील झाला आणि हास्यास्पद प्रत्युत्तराने रोहित आणि रैनाला ट्रोल केले. (रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनी मुंबई इंडियन्स, CSK खेळाडूंचा निवडला मिश्रित ऑलटाइम XI; सचिन तेंडुलकर, एमएस धोनी यांनाही मिळाले स्थान)
चहलच्या प्रश्नाला या खेळाडूंनी कोणतेही उत्तर दिले नाही, परंतु युवराजने एक मजेदार कमेंट केली. युवीने चहलला लग्न न करण्याचा सल्ला दिला. युवराज म्हणाला, जर चहलने लग्न केले तर त्याचे गाल रैना आणि रोहित सारखे गुबगुबीत होतील. युवीनेही रोहित आणि रैनासारखी गाल ठेवण्याचे एक मजेदार कारण दिले आहे. इन्स्टाग्रामच्या थेट सत्रामध्ये चहलच्या कमेंटवर भाष्य करताना युवराजने लिहिले की, "हे करु नको युजी. बायकोने मारल्यावर 'रैना आणि हिटमॅनच्या गालासारखे गुबगुबीत होतील."

चहलच्या कमेंटवर युवराजची प्रतिक्रिया

गेल्या दोन महिन्यांत चहलने आपल्या सोशल मीडियावरून यूजर्सचे भरपूर मनोरंजन केले आहे. आपल्या कुटुंबासमवेत क्वारंटाइन काळाचा आनंद लुटत असताना चहलने अनेक टीकटॉक व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. त्याने नुकतंच बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या लाईव्ह सत्रादरम्यान एक मजेदार टिप्पणी दिली होती.
(The above story first appeared on LatestLY on May 13, 2020 09:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

