Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा कसोटी सामना रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा 9 गडी राखून पराभव केला. 2021 नंतर पाकिस्तानचा घरच्या कसोटी मालिकेतील हा पहिला विजय ठरला. साजिद आणि नोमान अली यांनी या सामन्यात संघासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. या सामन्यात साजिदने 10 आणि नोमान अलीने 9 विकेट घेतल्या. केवळ 36 धावांचे लक्ष्य पाकिस्तान संघाने ते सहज गाठले. शान मसूदने 23 धावा करत पाकिस्तानला हा विजय मिळवून दिला. अशाप्रकारे पाकिस्तानने तिसरा कसोटी सामना 9 विकेटने जिंकून मालिका 2-1 ने जिंकली.
WTC पॉइंट टेबलमध्ये बदल
पाकिस्तानच्या या विजयामुळे डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत एक बदल झाला आहे. या विजयासह पाकिस्तान संघ आठव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंड संघाचा पराभव झाला आहे. इंग्लंड संघाची विजयाची टक्केवारी 40.79 आहे आणि गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा मार्ग इंग्लंडसाठी कठीण झाला आहे. भारतीय संघ अव्वल, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि श्रीलंका संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ चौथ्या तर न्यूझीलंडचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.
प्रत्येक विजयासाठी संघाला दिले जातात 12 गुण
प्रत्येक विजयासाठी, संघाला 12 गुण दिले जातात, तर बरोबरीत सहा गुण दिले जातात. सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी चार गुण मिळतात. संघांची क्रमवारी गुणांच्या आधारे नाही तर पीसीटीच्या आधारे केली जाते, हे लक्षात ठेवावे लागेल. फायनलमध्ये भारतावर शानदार विजय मिळवत ऑस्ट्रेलिया हा सध्याचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन आहे.