
इंग्लंड (England) मध्ये सुरु असलेला आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वकप आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. मागील सामन्यात यजमान इंग्लंडने न्यूझीलंड (New Zealand) चा पराभव करत सेमीफाइनलचे तिकीट पक्के केले. विश्वकपच्या सेमीफिनलंयचे चित्र जवळ-जवळ पूर्ण झाले आहे पण चौथ्या क्रमांकावर कोण असणार याची उत्सुकता सर्वाना आहे. तसं, न्यूझीलंडचा संघ यासाठी प्रथम क्रमांकाचा दावेदार मानला जात आहे तर पाकिस्तान (Pakistan) संघाला चमत्कारच सेमीफाइनलचे तिकीट मिळवून देऊ शकतो. (ICC World Cup 2019: एम एस धोनी या कारणामुळे सतत बदलत आहे विश्वचषकात बॅट, निवृत्तीशी निगडित आहे कारण)
गुणतालिका पाहता भारतीय संघाने आतापर्यंत 8 सामन्यात आतापर्यंत 6 सामने जिंकले आहेत तर एक सामना पावसामुळं रद्द झाला आणि एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे 13 गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा श्रीलंका (Sri Lanka) विरोधात एक सामना बाकी आहे. हा सामना जिंकत भारताचे 15 गुण होऊ शकतात. दरम्यान, ऑस्ट्रेलिया (Australia) चा दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध एक सामना बाकी आहे. ऑस्ट्रेलियाने आफ्रिका विरूद्ध सामना जिंकला आणि भारताने श्रीलंकाला पराभूत केले तर विराटसेना 11 जुलैला बर्मिंगहॅम (Birmingham) च्या एजबस्टन (Edgbaston) इंग्लंडचा सामना करेल. पण जर दक्षिण आफ्रिकाने ऑस्ट्रेलियाला नमवले आणि भारताने श्रीलंकाविरूद्ध विजय मिळविला तर भारत अव्वल अव्वल क्रमांकावर जाईल आणि 9 जुलै रोजी मॅन्चेस्टर (Manchester) च्या मैदानावर न्यूझीलंड संघाला फायनलसाठी आव्हान देईल.
मात्र, गुणतालिकेत टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता जास्त आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे तर दक्षिण आफ्रिका आपल्या पहिल्या मॅचपासूनच संघर्ष करताना दिसतेय. म्हणून ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी त्यांना पसंती दिली जात आहे. याचा अर्थ ऑस्ट्रेलिया ओल्ड ट्रॅफर्डमधील सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडचा सामना करेल. पण जर दक्षिण आफ्रिकाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आणि श्रीलंकाविरुद्ध सामन्यात भारत विजयी झाला तर अॅरॉन फिंच (Aaron Finch) याच्या संघाला सेमीफाइनलमध्ये इंग्लंडचे आव्हान असेल.
भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे चारही संघ संतुलित आहेत. विश्वकपमधील सेमीफायनलची पहिली लढत 9 जुलै रोजी होणार आहे. तर दुसरी लढत 11 जुलै रोजी होणार आहे. आणि अंतिम लढत 14 जुलै रोजी इंग्लंडच्या लॉर्ड्स (Lords) मैदानावर होणार आहे.