Women's T20 Challenge 2020: मिताली राजच्या वेलॉसिटी (Velocity) आणि स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर (Trailblazers) यांच्या महिला टी-20 चॅलेंजचा दुसरा सामना आज शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. आजच्या सामन्यात मिताली राजने (Mithali Raj) टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. वेलॉसिटीचा आजचा स्पर्धेतील दुसरा सामना असल्याने मागील सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. वेलॉसिटीचा आजचा स्पर्धेतील दुसरा सामना आहे, तर ट्रेलब्लेझरचा पहिलाच सामना आहे. वेलॉसिटीने मागील सामन्यात हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हासवर 5 विकेटने मात करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली, अशा स्थितीत आजच्या सामन्यात वेलॉसिटी आपली विजयी घोडदौड सुरु ठेवून फायनलमधील स्थान निश्चित करण्याच्या निर्धारित असतील. वेलॉसिटीने आजचा सामना जिंकल्यास ते थेट फायनलमध्ये पोहचतील. ट्रेलब्लाझरचे नेतृत्व युवा सलामी फलंदाज स्मृती मंधाना करताना दिसेल. आक्रमक फलंदाज देखील विजयासह मोहीम सुरू करण्याचा प्रयत्न करेल. (VEL vs TRA, WT20 Challenge 2020 LIVE Streaming: वेलॉसिटी आणि ट्रेलब्लेझर यांच्यातील महिला टी-20 चॅलेंज लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)
दोन्ही संघांमध्ये स्वत:बळावर सामना बदलण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत. वेलॉसिटी संघाने त्यांच्या संघात बदल केला असून आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये मनाली दक्षिणीच्या जागी सुश्री दिव्यदर्शिनीला संधी दिली आहे. डॅनिएल व्हाइट, सुने लुस, लेग कसपारेक आणि जहानारा आलम असे विदेशी खेळाडूंचा वेलॉसिटी संघात समावेश आहे. दुसरीकडे, ट्रेलब्लाझरमध्ये परदेशी खेळाडू म्हणून डिएंड्रा डॉटिन, नाथकन चांथम, सलमा खातून आणि सोफी एक्लेस्टोन यांचा समावेश आहे.
पाहा वेलॉसिटी आणि ट्रेलब्लेझर प्लेइंग इलेव्हन:
वेलॉसिटी: मिताली राज (कॅप्टन), सुषमा वर्मा, शेफाली वर्मा, डेनियल व्याट,वेदा कृष्णमूर्ती, सुश्री दिव्यदर्शिनी, सुने लुस, शिखा पांडे, एकता बिष्ट, लेघ कासपेरेक, जहानारा आलम.
ट्रेलब्लेझर: स्मृति मंधाना (कॅप्टन), डिएंड्रा डॉटिन, रिचा घोष, दीप्ति शर्मा, दयालन हेमलता, हर्लीन देओल, नट्टकन चंटम, सलमा खातुन, सोफी एक्लस्टोन, राजेश्वरी गायकवाड, झूलन गोस्वामी.