महिला टी-20 चॅलेंज 2020 (Photo Credit: Twitter/IPL)

WT20 Challenge 2020 LIVE Streaming: महिला टी-20 चॅलेंजचा (Women's T20 Challenge) दुसरा सामना आज मिताली राजच्या वेलॉसिटी (Velocity) आणि स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर (Trailblazers) संघात खेळला जाईल. महिला टी-20 चॅलेंजचा आजचा सामना देखील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) खेळला जाईल. मिताली राजच्या वेलॉसिटीने स्पर्धेची विजयी सुरुवात केली. मिताली पुढाकार घेऊन खेळण्यास आणि 2019 च्या पराभवाचा बदला घेण्यासाठी घेण्यास उत्सुक असतील ज्यात ट्रेलब्लेझरने अखेरच्या ओव्हरमध्ये चार गडी राखून विजय मिळवला होता. वेलॉसिटी आणि ट्रेलब्लेझर यांच्यातील आजचा महिला टी-20 चॅलेंज सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण भारतीय प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. तसेच Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.सामना दुपारी 3:00 वाजता टॉस होणार तर सामना अर्धातास नंतर म्हणजेच 3:30 वाजल्यापासून सुरु होईल. (Women's T20 Challenge 2020: Sune Luus, सुषमा वर्माने फिरवला सामना, सुपरनोव्हासचा 5 विकेटने पराभव करत वेलॉसिटीची विजयी सलामी)

वेलॉसिटी संघाने यंदाच्या स्पर्धेची विजयी सुरूवात केली, तर ट्रेलब्लेझर देखील आजच्या सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ करू पाहत असतील. फेब्रुवारी-मार्च महिन्यात महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आणि कोरोना व्हायरस ब्रेकनंतर सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडू पुन्हा मैदानात पुनरागमन करतील. या स्पर्धेत थायलंडची सलामीची फलंदाज नाथकन चांथम स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझरकडून खेळताना दिसेल. ट्रेलब्लाझर संघात भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी, इंग्लिश फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन आणि वेस्ट इंडी स्टार डियांड्रा डॉटिन देखील आपला दम दाखवताना दिसतील.

पाहा वेलॉसिटी आणि ट्रेलब्लेझर  संघ

वेलॉसिटी: मिताली राज (कॅप्टन), शाफाली वर्मा, वेदा कृष्णमूर्ती, सुषमा वर्मा, एकता बिष्ट, मानसी जोशी, शिखा पांडे, देविका वैद्य, सुश्री दिव्यदर्शिनी, मनाली दक्षिणी, लेघ कासपेरेक, डेनियल व्याट, सुने ल्यूस, जहानारा आलम, एम अनघा.

ट्रेलब्लेझर: स्मृति मंधाना (कॅप्टन), पुनम राऊत, डिएंड्रा डॉटिन, दयालन हेमलता, दीप्ति शर्मा, सलमा खातुन, नुजत परवीन (विकेटकीपर), नट्टकन चंटम, राजेश्वरी गायकवाड, सोफी एक्लस्टोन, झूलन गोस्वामी, हर्लीन देओल, रिचा घोष, काश्वी गौतम, सिमरन बहादुर.