हर्षा भोगले आणि विराट कोहली (Photo Credit: Instagram/IANS)

भारतीय संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) वेस्ट इंडिज (West Indies) विरूद्ध टर्मिनेटर मोडमध्ये होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात त्याने 29 चेंडूत नाबाद 70 धावा फटकावल्या. केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर विराटने तुफानी डाव खेळत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास महत्वाची भूमिका बजावली. यापूर्वीदेखील पहिल्या मॅचमध्ये विराटने एकहाती संघाला विजय मिळवून दिला. हैदराबादमधील मॅचमध्ये विराट टी-20 मधील त्याची सर्वोत्तम 94 धावांची खेळी केली आणि विंडीजने दिलेल्या 208 धावांचा टप्पा गाठला. राहुल, रोहित आणि विराटच्या त्रिकूटांनी मुंबईकरांचे चांगले मनोरंजन केले. आणि याच्याशी प्रभावित होऊन भाष्यकार हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी ट्विटरवर चाहत्यांना एक प्रश्न विचारला ज्याच्या प्रत्युत्तरात त्यांना नेटकऱ्यांनी मजेदार उत्तरं दिली. (Video: केसरीक विल्यम्स ने विराट कोहली ला पुन्हा चिडवले, 'किंग कोहली' ने षटकार मारल्यावर दिलेली रिअक्शन पाहून तुम्हीही म्हणाल Wohooooo)

विराटने स्वतःच्या खेळीने भोगलेंना आश्चर्यचकित केले आणि त्याने ट्विटरवर पोस्ट शेअर करत विचारले, "विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर काही करू शकत नाही, असे एखाद्याला माहित आहे काय?" भोगलेच्या या प्रश्नावर नेटकऱ्यांनी मजेदार प्रतिसाद दिला. काही म्हणाले आयपीएल किंवा आयसीसी  ट्रॉफी, तर एका यूजरने लिहिले की तो योग्य डीआरएस कॉल घेऊ शकत नाही.

पाहा हर्षाच्या ट्विटवर नेटिझन्सची प्रतिक्रिया:

आयसीसी स्पर्धा जिंकणे

चार 4 आणि सात 6s

महत्त्वपूर्ण नॉकआउट्सचा पाठलाग

आयसीसी फायनल्समध्ये विजयी कामगिरी

सॅंडपेपरचा वापर

आरसीबीसोबत आयपीएल जिंकणे

योग्य डीआरएस कॉल घेऊ शकत नाही

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मालिकेच्या अखेरच्या टी-20 सामन्यात टीम इंडियानेआपली क्षमता दाखवून वेस्ट इंडिजला 67 धावांनी हरवून तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. सलामीची जोडी रोहित आणि राहुलने पहिल्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कोहलीने फक्त 29 चेंडूंत नाबाद 70 धावा केल्या आणि तिसर्‍या विकेटसाठी राहुलसह 95 धावांची भर घातली. भारतीय गोलंदाजांनी विंडीज फलंदाजांची क्लास घेत अर्धा संघ फक्त 103 धावांवर पॅव्हिलिअनमध्ये पाठवला. भारताच्या 240 धावांच्या आव्हानाच्या प्रत्युत्तरात विंडीजला 173 धावांच करता आल्या.