Steve Smith (Photo Credit - X)

WI vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) दुखापतीतून ठिक होऊन 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या (WI vs AUS 2nd Test) दुसऱ्या कसोटीत परतू शकतो असे संकेत दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यादरम्यान बोटाला झालेल्या दुखापतीमुळे स्मिथ काही काळ क्रिकेटमधून बाहेर होता. स्मिथने लक्षणीय सुधारणा दर्शविली आहे. कर्णधार पॅट कमिन्सने त्यावर प्रक्रिया दिली आहे. मॅकडोनाल्ड यांनी स्मिथच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती देताना म्हटले आहे की, "बोटाच्या दुखापतीतून तो ठिक होत आहे. तो परत खेळेल."

स्मिथच्या अनुपस्थितीत, जोश इंगलिस पहिल्या कसोटीत फलंदाजी क्रमात चौथ्या क्रमांकावर खेळत होता. त्याने दोन्ही डावात 5 आणि 12 धावा केल्या. मॅकडोनाल्ड यांनी स्पष्ट केले की स्मिथ चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला परतेल. गेल्या वर्षभरात तो उत्कृष्टपणे खेळला आहे. मॅकडोनाल्ड म्हणाले, "आम्हाला त्याला क्रमांक 4 म्हणून पाहिल्यास, तो चांगला खेळतो. तो क्रमांक 3 वरही उत्कृष्ट कामगिरी करत आहे. .