SRH vs RR, IPL 2024 Pitch Report: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये कोणाला मिळणार मदत, गोलंदांज की फलंदांज? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
SRH vs RR (Photo Credit - X)

SRH vs RR, IPL 2024: आयपीएल 2024 च्या 50 व्या (IPL 2024) सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सशी (SRH vs RR) होणार आहे. या सामन्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघ आमनेसामने येतील. पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थानचा संघ जिंकल्यास प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी, सनरायझर्स संघ गेल्या दोन सामन्यांमध्ये रुळावरून घसरला आहे. त्यामुळे या सामन्यात बरेच काही पणाला लागणार आहे. पराभवामुळे त्यांचा पुढचा मार्ग कठीण होईल. तसेच, दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता.

खेळपट्टीचा अहवाल

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी सपाट विकेटसाठी ओळखली जाते. या खेळपट्टीवर फिरकीपटूंना अधिक पाठिंबा मिळेल. या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला आतापर्यंत अधिक यश मिळाले आहे. या खेळपट्टीवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 168 धावांची आहे. (हे देखील वाचा: SRH vs RR, IPL 2024 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यांत आज होणार लढत, येथे पाहू शकतात लाइव्ह सामना)

सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, शाहबाज अहमद, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी. नटराजन.

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.