ICC Women’s T20 World Cup 2024: आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 (ICC Women’s T20 World Cup 2024) 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. युएई (UAE) मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. या 10 संघांमध्ये एकूण 23 सामने खेळले जाणार आहेत, त्यानंतर महिला टी-20 क्रिकेटला नवीन चॅम्पियन मिळेल. टीम इंडिया (Team India) यावेळी विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. या टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाच्या वेळापत्रकाबद्दल जाणून घेवूया. (हे देखील वाचा: ICC Women’s T20 World Cup 2024 मध्ये भारताचा कसा आहे विक्रम? सेमीफायनलमध्ये 4 वेळा भंगले स्वप्न)
एकूण 10 संघ होणार सहभागी
या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होत असून त्यांची प्रत्येकी 5 गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेसह सहा वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. तर बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड या संघांना ब गटात ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत प्रत्येक संघाला साखळी टप्प्यात 4-4 सामने खेळावे लागतील. यानंतर दोन्ही गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 ऑक्टोबरला आणि अंतिम सामना 20 ऑक्टोबरला होणार आहेत.
𝐓𝐇𝐄 𝐖𝐀𝐈𝐓 𝐈𝐒 𝐎𝐕𝐄𝐑 𝐅𝐎𝐑 𝐂𝐑𝐈𝐂𝐊𝐄𝐓 𝐅𝐀𝐍𝐒 🤩
The ICC Women's T20 World Cup 2024 schedule is finally here! Bangladesh is set to take on Scotland in the opening match in Sharjah, Dubai on October 3, 2024 pic.twitter.com/ThxJryfSnH
— CricTracker (@Cricketracker) August 26, 2024
येथे पाहा भारताचे वेळापत्रक
4 ऑक्टोबर, शुक्रवार, भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
6 ऑक्टोबर, रविवार, भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
9 ऑक्टोबर, बुधवार, भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
13 ऑक्टोबर, रविवार, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाचे खेळाडू
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (फिटनेस नुसार), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील (फिटनेस नुसारर), सजना सजीवन
प्रवास राखीव: उमा छेत्री (यष्टीरक्षक), तनुजा कंवर आणि सायमा ठाकोर
गैर प्रवासी राखीव: राघवी बिश्त आणि प्रिया मिश्रा