Women's Team India (Photo Credit - X)

ICC Women’s T20 World Cup 2024: आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 (ICC Women’s T20 World Cup 2024) 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. युएई (UAE) मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. या 10 संघांमध्ये एकूण 23 सामने खेळले जाणार आहेत, त्यानंतर महिला टी-20 क्रिकेटला नवीन चॅम्पियन मिळेल. टीम इंडिया (Team India) यावेळी विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. या टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत कशी कामगिरी केली आहे ते या रिपोर्टमध्ये जाणून घेऊया. (हे देखील वाचा: ICC Women's T20 World Cup 2024 मध्ये टीम इंडियाचे सराव सामने आजपासून, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार विनामूल्य सामना)

एकूण 10 संघ होणार सहभागी

या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होत असून त्यांची प्रत्येकी 5 गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेसह सहा वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. तर बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड या संघांना ब गटात ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत प्रत्येक संघाला साखळी टप्प्यात 4-4 सामने खेळावे लागतात. यानंतर दोन्ही गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 ऑक्टोबरला आणि अंतिम सामना 20 ऑक्टोबरला होणार आहेत.

टीम इंडियाची कशी आहे कामगिरी ?

या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी संमिश्र झाली आहे. टीम इंडियाला आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. भारतीय संघ 2009 मध्ये पहिला विश्वचषक खेळला होता, ज्यामध्ये संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. तेव्हापासून हा संघ 4 वेळा उपांत्य फेरीचा सामना आणि एकदा अंतिम सामना गमावून स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

ICC Women’s T20 World Cup 2024 मध्ये भारताचा कसा आहे विक्रम? 

2009    उपांत्य फेरी

2010     उपांत्य फेरी

2012      गट टप्पा

2014      गट टप्पा

2016      गट टप्पा

2018      सेमीफायनल

2020     उपविजेते

2023      उपांत्य फेरी

आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाचे खेळाडू

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (फिटनेस नुसार), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील (फिटनेस नुसारर), सजना सजीवन

प्रवास राखीव: उमा छेत्री (यष्टीरक्षक), तनुजा कंवर आणि सायमा ठाकोर

गैर प्रवासी राखीव: राघवी बिश्त आणि प्रिया मिश्रा