आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत विराट कोहलीला (Virat Kohli) जबरदस्त फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अहमदाबाद कसोटीत विराटने शानदार शतक झळकावले, ज्यामुळे त्याने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. याशिवाय अक्षर पटेललाही (Axar Patel) ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजीचा फायदा झाला आहे. विराट कोहलीला कसोटी क्रमवारीत सात स्थानांचा फायदा झाला आहे. विराट कोहली याआधी कसोटी फलंदाजांच्या यादीत 20 व्या क्रमांकावर होता, पण आता तो 7 गुणांनी 13व्या स्थानावर पोहोचला आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीत 186 धावांची शानदार इनिंग खेळली होती. विराटने तब्बल तीन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले. (हे देखील वाचा: WTC Final 2023: केएल राहुल की केएस भरत? सुनील गावसकरांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी निवडला विकेटकीपर)
A whole host of India stars have climbed the charts in the @MRFWorldwide ICC Men's Player Rankings after the Border-Gavaskar triumph 👊
Details 👇
— ICC (@ICC) March 15, 2023
अक्षरला बॅटिंग-बॉलिंगचा फायदा
त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चारही कसोटी सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेललाही ताज्या आयसीसी क्रमवारीत फायदा झाला आहे. अक्षरने 8 स्थानांची प्रगती करत 44व्या स्थानावर पोहोचले आहे. कसोटी अष्टपैलूंच्या यादीत तो 2 गुणांच्या फायद्यासह चौथ्या स्थानावर कायम आहे. पहिल्या क्रमांकावर रवींद्र जडेजा, तिसऱ्या क्रमांकावर आर अश्विन, तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेशचा शाकिब अल हसन आणि चौथ्या क्रमांकावर अक्षर पटेल आहे. दुसरीकडे, अक्षर पटेल गोलंदाजांच्या यादीत 28 व्या स्थानावर आहे.
अश्विन-जडेजा नंबर वन
त्याचबरोबर आर अश्विनने गोलंदाजांच्या यादीत आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. अक्षर पटेल 869 गुणांसह पहिल्या क्रमांकाचा कसोटी फलंदाज आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजा 431 गुणांसह कसोटीत पहिल्या क्रमांकावर आहे. या दोन्ही खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे.