Virat Kohlli (Photo Credit - Twitter)

Virat Kohli: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाचा पहिला डाव 67.4 षटकात 245 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियासाठी केएल राहुलने सर्वाधिक 101 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 बळी घेतले. याआधी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचे फलंदाज लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतले त्यानंतर केएल राहुलने डावाची धुरा सांभाळली. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या डावात मोठी धावसंख्या करू शकला नाही, मात्र त्याने संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा विक्रम मोडीत काढला आहे. सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहलीने 64 चेंडूत 38 धावांची खेळी केली.

यादरम्यान विराट कोहलीच्या बॅटमधून 5 चौकारही आले. टीम इंडियाने पहिले 3 विकेट लवकर गमावले, पण विराट कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने डाव सांभाळला. मात्र, विराट कोहलीला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आले नाही आणि दुसऱ्या सत्रात तो लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला. (हे देखील वाचा: IND Squad for U19 World Cup 2024: आयसीसी पुरुष अंडर-19 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, पंजाबचा उदय सांभाळणार संघाची कमान)

राहुल द्रविड टाकले मागे

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविडला मागे टाकले आहे. याआधी विराट कोहलीने 1236 धावा केल्या होत्या. त्याचवेळी राहुल द्रविडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत 1252 धावा केल्या होत्या. आता विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत 1274 धावा केल्या आहेत. या यादीत माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर 1741 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज

सचिन तेंडुलकर- 1741 धावा

वीरेंद्र सेहवाग- 1306 धावा

विराट कोहली- 1274 धावा

राहुल द्रविड- 1252 धावा

व्हीव्हीएस लक्ष्मण- 976 धावा

टीम इंडियाचे हे स्टार फलंदाज ठरले फ्लॉप 

टीम इंडियाच्या पहिल्या डावात केएल राहुलशिवाय भारताचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. सलामीवीर रोहित शर्मा 5 धावा करून तर यशस्वी जैस्वाल 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर शुभमन गिलही 2 धावा करून बाद झाला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांना चांगली सुरुवात झाली पण त्यांना मोठी धावसंख्या करता आली नाही. विराट कोहलीने 38 धावा केल्यानंतर आणि श्रेयस अय्यरने 31 धावा केल्यानंतर विकेट गमावली.