विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे नाव आज महान क्रिकेटपटूंमध्ये सामिल आहे. पण, आज त्याला मिळालेले यश आणि कीर्ती मिळवण्यासाठी एक वेळी त्याला खूप संघर्ष करावा लागला होता. याबद्दल स्वतः विराटने खुलासा केला. 'अनॅकॅडेमी' (Unacademy) ऑनलाइन क्लासमध्ये कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी संघर्षाविषयी उघडपणे बोलले. कोहली म्हणाला की एकदा त्यांची राज्य संघात निवड झाली नव्हती. याबद्दल तो अस्वस्थ झाला आणि रात्रभर रडला. त्याने स्वत: सांगितले की माझी निवड का होत नाही असे तो प्रशिक्षकाला विचारत असे. कोहलीने 2008 मध्ये त्याच्या नेतृत्वात भारताने अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. त्याने 86 कसोटी सामन्यात 7,240, 248 वनडे सामन्यात 11,867 आणि 82 टी-20 मध्ये 2,794 धावा केल्या आहेत. (लॉकडाउनच्या काळात अनुष्का शर्माने केली विराट कोहली याच्याकडे भलतीच मागणी, पाहा व्हिडिओ)

कोहली म्हणाला, ‘‘राज्य संघात निवड करताना मला पहिले नाकारले गेले. मला आठवते, मग मी रात्रभर रडत होतो. मी एकदम निराश झालो होतो आणि मला रात्री 3 वाजे पर्यंत रडत होतो. मला नाकारले गेले यावर माझा विश्वास नव्हता.’’ कोहलीने 2006 मध्ये घरातील टीम दिल्लीबरोबर पदार्पण केले. 2 वर्षानंतर त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळालं आणि त्याने श्रीलंकाविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. भारताला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकावणाऱ्या विराटच्या नावावर आज अनेक विक्रमांची नोंद आहे. त्यानंतर मोठ्या अडचणीने संघात स्थान मिळवणाऱ्या या फलंदाजाने सातत्यपूर्ण कामगिरी करत प्रथम संघात स्थान मिळवले आणि त्यानंतर कर्णधार बनला. कोहली म्हणाला की कोरोना विषाणूमुळे लोकं अधिक उदार झाले आहेत. संकट उद्भवल्यानंतरही डॉक्टर आणि पोलिसांसारखे आघाडीवर उभे राहिलेल्या कोरोना योद्धाप्रती कृतज्ञतेची भावना कायम राहील अशी अशा त्याने व्यक्त केली.

भारतीय कर्णधार म्हणाला, "मी सर्व सामन्यांत चांगली कामगिरी केली होती. सर्व काही व्यवस्थित चालू होते. लोक माझ्या खेळीने खूष झाले. मी प्रत्येक स्तरावर चांगले काम केले. असे असूनही, मला नाकारले गेले. मी माझ्या प्रशिक्षकाशी याबद्दल 2 तास बोललो. मला त्याबद्दल अद्याप काहीही कळाले नाही. जिथे संयम व वचनबद्धता आहे तेथे प्रेरणा आपोआप येते आणि यश येते असा माझा विश्वास आहे.’’