COVID 19 Vaccination | Photo Credits: ANI and Twitter

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि ईशांत शर्मा (Ishant Sharma) यांनी आज  कोविड 19 लसीचा (COVID 19 Vaccine) पहिला डोस घेतला आहे. विराटने इंस्टाग्रामवर पोस्ट नागरिकांना कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केले आहे. दरम्यान ईशांत देखील त्याची पत्नी प्रतिभा सोबत लसीकरण केंद्रावर पोहचला होता. त्याने लस घेतल्याचे फोटोज सोशल मीडीयामध्ये पोस्ट केले आहे.

भारतीय क्रिकेट संघ 2 जून दिवशी इंग्लंडच्या साडेतीन महिन्यांच्या दौर्‍यासाठी रवाना होणार आहे. या इंग्लंड दौर्‍यामध्ये ते न्युझिलंड विरूद्ध विश्व टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि नंतर इंग्लंड संघाविरूद्ध 5 टेस्ट मॅचेस खेळणार आहेत. त्यामुळे सध्या क्रिकेटर्स त्यांचं लसीकरण पूर्ण करत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये अजिंक्य रहाणे याने पत्नीसोबत कोविड 19 ची लस घेतली. बॉलर उमेश जाधव आणि सलामीवीर शिखर धवन यांनी देखील लस घेतली आहे.

ईशांत शर्मा

विराट कोहली

भारतामध्ये मागील आठवड्यात कोरोनाच्या भीतीमुळेच यंदाचा आयपीएल सीझन रद्द करण्यात आला आहे. सध्या सारेच खेळाडू आपल्या घरी आहेत. तर परदेशी क्रिकेटर्सनी देखील मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. IPL 2021 रद्द झाल्यानंतर Virat Kohli करतोय 'हे' काम, पाहा फोटो.

विराट कोहलीने देशातील कोविड 19 स्थितीचं भान राखत पत्नी अनुष्कासोबत COVID-19ने ग्रस्त लोकांच्या मदतीसाठी निधी गोळा करण्यासाठी ऑनलाईन मोहिम सुरू केली आहे. यामध्ये जमा झालेली रक्कम कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी वापरली जाणार असल्याचं सांगितले आहे. या निधिमध्येही नागरिकांनी मदतीचा हात पुढे करत सहकार्य करण्याचं आवाहान विरूष्काने केले होते.